दीपक जगताप खालापूर २० एप्रिल,
भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका पदाधिकारी यांची गटविकास अधिकारी यांची जनजीवन मिशन योजना,खालापूर तालुक्यातील पाणी टंचाई, महात्मा गांधी रोजगार हमी ग्रामीण रस्ते ह्या कामांबाबत विविध मुद्द्यावर चर्चा करत लवकर प्रश्न सोडवण्यासाठी साठी खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांस निवेदन देण्यात आले. खालापूरात चिलठण, होराळे बीड जांबरुंग, कलोते अशा ७६ ठिकाणी जलजीवनची कामे सुरू आहेत.या सर्व गावातील ग्रामस्थांनी खालापूर पंचायतीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष व खालापूर तालुका संपर्कप्रमुख प्रल्हाद केणी तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, महिला तालुकाध्यक्ष सुजाता दळवी,रायगड जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, खालापूर तालुका सरचिटणीस शशिकांत मोरे,सरपंच प्रितेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य नागेश पाटील, गणेश कदम,लवेश कर्णुक, दिपक जगताप,शितल वाघरे ,राजेंद्र कदम, अरुण घोंगे , भाऊ घाडगे, दगडू देवकर, प्रमोद देवकर ,देविदास घोंगे, सुनील ढोकळे ,रवी पाटील व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, विस्तार अधिकारी तांडेल, जलजीवन योजनेचे अभियंता सुरेश इंगळे व मान्यवर उपस्थित होते.
0 Comments