दत्तात्रय शेडगे खोपोली : २० एप्रिल,
बोरघाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव १ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव १ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडतो त्याचप्रमाणे याही वर्षी वीर हुतात्मा शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी हा उत्सव बोरघाट( शिंग्रोबा मंदिर) येथे आयोजित केला आहे.
सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत श्रींचा महाअभिषेक ८ते ९ सत्यनारायण पूजा, ९ ते ११ श्रींची भव्य पालखी मिरवणूक शिलफाटा ते मंदिरापर्यंत, १० ते १२ ह.भ. प.रायगड भूषण काशिनाथ महाराज वाघुले यांचे कीर्तन, १ वाजता मान्यवरांचा सत्कार ,२ ते ३ महिलांसाठी हळदीकुंकू, ३ वाजता गजनृत्य, आणि ६ वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी या उत्सव सोहळ्याला महाराष्ट्रातुन भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक तथा धनगर समाजाचे नेते बबनशेठ शेडगे यांनी केले आहे
0 Comments