दीपक जगतात खालापूर : २१ एप्रिल,
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक महड येथे आज घेण्यात आली. ह्या मध्ये बूथ सशक्तीकरण ,शक्तीकेंद्र प्रमूख,मन की बात ह्या विषयावर आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांकढून केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.यावेळी बहुसंख्येने कार्यकर्ते आणी पदाधिकारी उपस्थित होते.
ह्यावेळी चौक येथील भाजपा कार्यकर्ते यशवंत जोशी यांची कन्या श्रावणी यशवंत जोशी हिने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय आय एम) इथून मास्टर ऑफ बिझबेस एडमिशन एम.बी.ए ची डिग्री मिळवल्या बद्दल तिचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
ह्या वेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर, बाळासाहेब पाटील प्रदेश कार्यकारणी सदस्य, दिपक बेहरे संघटन सरचिटणीस, नितीन पाटील सरचिटणीस, विनोद साबळे सरचिटणीस रायगड जिल्हा,विठ्ठल मोरे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भाजप, सुनील घरत उपाध्यक्ष भाजपा, मयुरेश नेटकर जिल्हा युवक अध्यक्ष भाजपा ,प्रल्हाद केणी उपाध्यक्ष भाजपा व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments