कुंभिवली परिसरात अनाधिकृत रात्रीच्या दरम्यान उत्पादन करणाऱ्या कारखाण्यात आग मालासह वाहन जळून खाक,परिसरात धुराचे लोट नागरिकांमध्ये घबराट

 


प्रशांत गोपाळे
खोपोली : ९ एप्रिल,

             खालापूर तालुक्यात कुंभिवली ग्राम पंचयत हद्दीत अनाधिकृत पणे टायर  पासून ऑइल बनविणारी कंपनी कार्यरत असून या कंपनीची उत्पादन प्रक्रिया रात्रीच्या दरम्यान सुरू ठेवली जाते मात्र या ठिकाणी  बाजूला माळरान असल्याने उन्हाच्या तडाख्यात आग लागल्याने ही आग कारखान्यात पोहचल्याने टायर बनविण्यासाठी असणाऱ्या केमिकल ने आग पकडल्याने सर्वत्र आगीचे लोट पसरले आणि आगीने रौद्ररूप धारण केले गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडल्याने गावकऱ्यांची आग आटोक्यात आणण्यासाठी पळापळ सुरु झाली आणि आग विजविण्यासाठी परिसरातील कारखान्यांच्या अग्निशमक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले या आगीत कारखान्यात असणाऱ्या मालाचे मोठे नुकसान झाले दैव बलत्तर  म्हणून बाजूच्या ज्वलनशील कारखान्यांना या आगीची झळ बसली नाही 
                 ग्रामस्थानी दिलेल्या माहिती नुसार कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रातरपाळीत कारखाना सुरू ठेवून या कारखान्यासाठी वापरण्यात आलेली जागा बिनशेती न करताच  दिल्ली येथील धनिक प्रशांत या मालकाने विजय प्रीत इंडस्ट्रील या नावाने  टायर ची पावडर बनवून केमिकल्स मिश्रण करून ऑइल बनविण्याची प्रक्रिया करून उत्पादन केली जाते उत्पादन करीत असताना परिसरात मोठा प्रदूषण होत असल्याने रात्रीच्या दरम्यान ही कंपनी कार्यरत असते अशी माहिती येथील ग्रामस्थानी दिली                      या कंपनीच्या बाजूला रानमाल असल्याने या ठिकाणी ७  मार्च ला दुपारी उन्हाच्या कडाक्यात वातावरण तापले असताना आग लागली ही आग या कारखान्यात गेली आणि येथील केमिकल आणि कच्चा माल टायरची पावडर ही आग पकडली त्यानंतर आगीचा भडका वाढतच गेला त्यामळे परिसरात धुराचे लोट पसरले गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याने वयोवृध्द व लहान मुलासह ग्रामस्थांची आगीची बातमी समजताच तारांबळ उडाली आगीची तीव्रता वाढतच गेल्याने आजूबाजूला केमिकल्स कंपन्या असल्याने सर्वत्र घबराट निर्माण झाली होती                   अग्निशामक दल खोपोली सह परिसरातील कारखान्यामधील अग्निशमक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले या बाबत येथील मालकाला सदरची माहिती येथील लोकप्रतिनिधी देत असताना बेफिकिरपणे आपण बाहेर गावी असल्याचे सांगितले असल्याचे येथील उपस्थित ग्रामस्थ सांगत असताना या कंपनी बाबत संताप व्यक्त करीत होते या आगीत कारखान्याचे आतील सर्व मालासह वजन उचलणारे वाहन ही जळून खाक झाले आहे या आगीची गंभीरता लक्षात घेत तहसीलदार आयुब तांबोळी पोलीस निरीक्षक बाळा कुंभार माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड आदी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते 

चौकट
सदरचा कारखाना हा अनाधिकृत आहे या कारखान्याला कोणत्याही प्रकारे परवानगी दिलेली नाही तसेच प्रदूषण करणारा कारखाना असल्याने परिसराला मोठा त्रास आहे या बाबत प्रदूषण मंडळाला अनेक वेळा पत्रव्यवाहर ही केले आहे आज ही लागलेली आग परिसराला वेटीस धरणारी व जीव धोक्यात घालणारी आहे त्यामुळे या कारखान्याची सखोल चौकशी करून शासनाने कारवाई कारवाई 
(  - ग्राम पंचायत कुंभिवली माजी  सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड )


Post a Comment

0 Comments

खालापूर पोलिसांकडून रेझिंग डे निमित्ताने सायबर क्राईम जनजागृती,