धर्मांतर विरोधी कायदा मागणीसाठी खोपोलीत आंदोलन

 


जयवंत माडपे                                                                 खोपोली : ९ एप्रिल,

धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी त्याचप्रमाणे हे हिंदूराष्ट्र घोषित करावे , या मागणीसाठी शनिवारी सायंकाळी शिळफाटा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन या संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.                           


              " हिंदू राष्ट्र घोषित करावे, त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील गरीब आदिवासी बांधवांना आर्थिक प्रलोभने दाखवून धर्मांतर केले जात आहे, त्यासाठी संसदेने धर्मांतर विरोधी कायदा मंजूर करावा, लव्ह जिहाद व इतर प्रवृत्तींना शासनाने रोखावे या व इतर प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन या हिंदुत्ववादी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या हिंदू संघटनांनी खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात  आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या, ठाणे जिल्हा समन्वयक सुनील कदम रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र पावसकर व इतर वक्त्यांनी यावेळी विचार मांडले.

Post a Comment

0 Comments

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य -  प्रा.मायाप्पा बुधे