महावीर जयंती निमित्त खोपोली शहरात प्राणी आणि पक्षांसाठी फ्री वॉटर बाऊलचे वितरण



गुरुनाथ साठीलकर : प्रतिनिधी                                        खोपोली : ६ एप्रिल,                                         

                'वॉटर फॉर व्हाईस लेस' या राष्ट्रीय स्तरावर प्राणी पक्षांच्या संवर्धनासाठी आणि मदतीसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून श्री कृपा एक्वेरियम आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून खोपोली शहरात फ्री वॉटर बाऊलचे वितरण करण्यात आले.  

  


                आपण व्हॉइसलेस म्हणत असलो तरी, प्राणी पक्षांचा व्हॉईस अर्थात त्यांची भाषा भावनांच्या माध्यमातून समजून घेत त्यांना मदत करणे हे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपले कर्तव्य असल्याने आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती विख्यात डॉग ट्रेनर तथा प्राणी मित्र विक्रांत देशमुख यांनी या वितरण प्रसंगी केली.  'वॉटर फॉर व्हाईस लेस'  या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील २५  शहरात साठ हजार वॉटर बाऊल वितरण करण्याचे लक्ष असून त्यासाठी शंभर मुख्य सदस्य रात्रंदिवस काम करत असल्याची माहिती संस्थेचे रायगड जिल्ह्या प्रमुख दिवेश राठोड यांनी दिली.    

                                     


                                                               या वितरण कार्यक्रमात वासुदेव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष किशोर ओसवाल, श्री कृपा एक्वेरीयमचे प्रवीण शेंद्रे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वर्षा मोरे आणि शहरातील प्राणी मित्र उपस्थित होते. खोपोली शहरात दुसऱ्यांदा हा कार्यक्रम पार पडला.



Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन