पाताळगंगा न्यूजच्या बातमीची नेरळ पोलिसांनी घेतली दखल,गोवंशीय जनावरांची कत्तल प्रकरणात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
अजय गायकवाड : प्रतिनिधी
कर्जत / नेरळ ४ एप्रिल
शेकडो गोवंशीय जनावरांची कत्तल प्रकरणात नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मंमदापूर आणि दामत ग्रामपंचायत हद्दीला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेत शेकडो गाईंची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार पाताळगंगा न्यूजने उघडकीस आणला होता,दरम्यान याची दखल घेत नेरळ पोलिसानी जागेची पाहणी करून अज्ञात व्यक्तिवोरोधात गुन्हा दाखल केला.
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दामत ग्रामपंचायत लागून असणाऱ्या परिसरात गाईंची कत्तल करून त्यांचे मांस विक्री केले जात असल्याची माहिती पाताळगंगा न्यूजच्या हाती लागली होती,दरम्यान याबाबत आमचे नेरळ प्रतिनिधी यांनी या प्रकाराची शहानिशा केली असता गावाच्या कडेला मोकळ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरांची कातडी ही एकाच ठिकाणी सापडून आली.बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची वस्ती आहे,परंतु याच परिसरात जनावरांची कातडी सापडून आल्याने मोठी खळबळ उडाली होती,
हिंदू धर्मांत गाईला मोठे स्थान आहे,असे असताना मोठ्या प्रमाणात जर गाईची कत्तल केली जात असून तीचे मांस विक्री करून कातडी देखील या नराधमांकडून विल्हेवाट न लावता फेकून दिले जात असेल तर गाईचे पावित्र्य तर धोक्यात आलेच शिवाय दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने याबाबत पाताळगंगा न्यूजच्या माध्यमातून हा प्रकार 2 एप्रिल रोजी उघडकीस आणला.दरम्यान आता या घटनेची नेरळ पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली,परंतु त्याअगोदारच जनावरांची कातडी ही जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न देखील झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं,
यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर व पोलीस श्रीकांत काळे तसेच नेरळ पोलीस टीम यांनी काही जनावरांची कातडी ही ताब्यात घेतली असून अज्ञात व्यक्ती विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ४२९, २०१, प्राणी संरक्षण अधिनियम ५( ब ) चे उल्लंघन, कलम९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्रीकांत काळे हे करीत आहेत.
एकूणच या परिसरात मोठ्या प्रमाण गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याचे समोर आले असून या अगोदर किती गोवंशीय जनावरे मारली गेली असावी म्हणून अंदाज लावला जात आहे,परंतु या घटनेत आरोपी पोलोसांच्या ताब्यात सापडणार का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0 Comments