दीपक जगतात
खालापूर १४ एप्रिल
खालापूर शहरात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.खालापूर नगरपंचायत व बौद्ध समाज विकास मंडळ खालापूर क्रांतीनगर ,साबाईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीचे आयोजन करुन सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास नगराध्यक्ष रोषणा मोडवे,उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले
ह्यावेळी नगरसेवक किशोर पवार,नगरसेविका लता लोते,नगरसेविका उज्ज्वला निधी, राजेश पार्टे ,आकेश जोशी ,प्रशांत बोंबे, प्रकाश वाढवे,उपस्थित होते तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी करण्यासाठी जयंती कमिटी अध्यक्ष वर्षा जाधव,उपाध्यक्ष साक्षी गायकवाड ,खजिनदार शारदाताई गायकवाड यांच्या सोबत सदानंद कवडे,सुरेश गायकवाड ,भीम कांबळे,यशवंत जाधव,रवी सोनावणे,विशाल वाघमारे,विशाल उशीरे ,वसंत मोरे,सुभाष गायकवाड ,राहुल गायकवाड,सुधीर कडवे, तुषार जाधव,प्रमोद जाधव ,
तसेच ऋषभ गायकवाड,समीर गायकवाड, निशांत पानपाटील,अनिकेत कदम,अजित गायकवाड यांच्यासह आदी ही जयंती साजरी करण्यासाठी मेहनत घेत आहेत तसेच जयंती निमित्ताने सायंकाळी खालापूर शहरात भव्य मिरवणूकीचे आयोजन असून सकाळी पूजापाठ व दुपारी १२ वाजता महिला व लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व सायंकाळी ७ वाजता भीमरजनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
0 Comments