काँग्रेसला मिळाले सक्षम नेतृत्व,विजय कदम माथेरान राष्ट्रीय काँग्रेस शहराध्यक्षपदी विराजमान



 अजय कदम                                                                  माथेरान :१२ एप्रिल,

              काही दिवसांपूर्वी काँग्रेस शहराध्यक्षासह पक्षातील कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता काँग्रेस कडे सक्षम नेतृत्व नसल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसला विजय गजानन कदम यांच्या नावाने सक्षम चेहरा मिळाला आहे.डीलाईट चिक्की मार्ट येथे राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष यांनी विजय कदम यांच्या नावाची घोषणा केली.                                               पुरोगामी विचारधारा असलेल्या काँग्रेस मधून फुटून शहराध्यक्ष मनोज खेडकर,माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाची कास धरत शिंदे गट शिवसेनेत दिनांक 7 रोजी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवशी जाहीर प्रवेश केला.तदनंतर काँग्रेसचे अस्तित्व माथेरान मधून संपणार अशा चर्चाना उधाण आले होते पण काही निष्ठावन्त कार्यकर्ते यांनी इतर पक्षात न जाताच पुरोगामी विचारधारा घेऊन काँग्रेस मध्येच राहण्याचा निर्णय घेतला.त्यामध्ये महत्वाचे नाव होते ते विजय गजानन कदम यांचे.एक कट्टर काँग्रेस कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असल्याने तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक असल्याने इंटकचे जिल्हाअध्यक्ष,राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, तसेच कर्जत तालुका निरीक्षक किरीट पाटील यांनी विजय कदम यांच्या नावाची घोषणा केली यावेळी कर्जत तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी,कर्जत विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सागर परदेशी उपस्थित होते.                                                                                          यावेळी बोलताना किरीट पाटील म्हणाले की स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी काँग्रेस सोडून गेलेली आहेत.हे गेलेली लोकं ही आमिषाला बळी पडणारी लोक आहेत म्हणून ते इतर पक्षात गेलेत.पुरोगामी विचारधारेने चालणारे लोक अचानक हिंदुत्वाची कास धरून कुठल्या कारणास्तव जातील हा विचार लोकांनी करायचा आहे.काँग्रेस ना कधी संपली ना कधी संपणार.विजय कदम यांच्या सोबत पूर्ण काँग्रेस पक्ष खंबीर उभा राहणार आहे.येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस गद्दारांना त्यांची जागा दाखवून देईल.तर विजय कदम यांनी सांगितले की जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो मी सार्थ ठरवेन.तळागाळातील कार्यकर्ता अजूनही काँग्रेससोबत आहेत त्यामुळे अधिक जोमाने काम करून काँग्रेस पक्ष पुढे नेणार याप्रसंगी निष्ठावन्त कार्यकर्ते बिलाल महाबळे, मंगेश मोरे,आशा कदम,तसेच सदस्य उपस्थित होते.


---------------------------------------------------------------------   विजय कदम यांची जमेची बाजू         

    1)काँग्रेसचे माजी नगरसेवक                                         2)क्षत्रिय मराठा समाज माजी अध्यक्ष                    3)माथेरान व्यापारी फेडरेशन सदस्य                          4)नवरात्र उत्सव मंडळ कार्यकारणी सदस्य              5)अश्वपाल संघटना सदस्य                                       6)वडील स्व. गजानन कदम यांनी सर्व समाजाबरोबर                  ठेवलेली जवळीक

          काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे माथेरानवर लक्ष

राष्ट्रीय काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी पक्षातील काही स्वार्थी लोक गेल्यावर पक्षाला उभारी देण्यासाठी सर्व लक्ष केंद्रित केले आहे.पक्ष वाढविण्यासाठी जे जे शक्य असेल ते केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार