दस्तुरी येथील अंतर्गत रस्त्याचे उदघाटन सपन्न,माजी नगरसेवक मनेश यादव यांच्या प्रयत्नांना यश, ग्रामस्थांनी मानले यादव यांचे आभार
दत्तात्रय शेडगे खोपोली :१२ एप्रिल,
खोपोली नगरपालिका हद्दीत येणाऱ्या दस्तुरी येथील अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आज त्या रस्त्याचे उदघाटन माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव यांच्या हस्ते पार पडले, घाटमाथ्यावर असलेल्या दस्तुरी येथील रस्त्याची समस्या अनेक वर्षांपासून होती, या रस्त्यावर दगड माती असल्याने पावसाळ्यात चिखल होऊन ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, याची दखल नगरसेवक मनेश यादव यांनी घेत नगरपालिका फंडातून निधी उपलब्ध करून देत या रस्त्याचे काम पूर्ण केले, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने आज त्याचे उदघाटन करून ग्रामस्थांना रस्ता चालू करून दिला
माजी नगरसेवक मनेश यादव यांच्या प्रयत्नांतुन हा रस्ता झाल्याने ग्रामस्थांनी मनेश यादव यांचे आभार मानले,यावेळी माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉग्रेस खोपोली शहर अध्यक्ष मनेश यादव, धनगर समाजाचे नेते बबन शेडगे, ओबीसी मावळ तालुका अध्यक्ष भरत कोकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेल मुळशी तालुका अध्यक्ष बाळासाहेब झोरे जेष्ठ नेते दीपक आखाडे, एकनाथ घाटे ,मनसे विभाग प्रमुख नितीन सुतक, रामभाऊ कोकरे, बबन जानकर, बाळू शेडगे, भाऊ शेडगे आदी उपस्थित होते
0 Comments