महाड प्रेस असोसिएशनला मिळाला मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार संघ पुरस्कार

 



पाताळगंगा न्यूज  : वृत्तसेवा 
महाड १० एप्रिल,
                अतिशय उत्कृष्ट काम आणि सामाजिक बांधिलकी जपत महाड तालुक्यामध्ये केलेले उल्लेखनीय काम ,विशेष म्हणजे कोविड काळात महाडचे माजी आमदार स्व: माणिकराव जगताप यांच्या लोकविकास सामाजिक संस्थेच्या समावेत महाड प्रेस असोसिएशनने चालवलेलं कोविड हॉस्पिटल या सर्व कामांची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेने यंदाचा कोकण विभागातून उत्कृष्ट पत्रकार संघटना म्हणून पुरस्कार महाड प्रेस असोसिएशनला जाहीर करण्यात आला होता 
             

  हा पुरस्कार ७ एप्रिलला कर्जत जामखेड येथे मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा या कार्यक्रमात दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजयजी राऊत यांच्या हस्ते तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख  आमदार रोहित पवार सभेचे विश्वस्त किरण नाईक , अध्यक्ष शरद पाबळे , कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर .  यांच्या सह परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी आणि  सर्व पदाधिकारी यांनी स्वीकारला.


      
         

Post a Comment

0 Comments

भाजपा सनी यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  आदिवासी बांधवांना जिवनाश्यक वस्तू वाटप