अजय गायकवाड
नेरळ /कर्जत : १० एप्रिल,
आपल्या वाढदिवसाच्या जन्मदिनी त्याने गावाच्या चक्क पाच ठिकाणी पाणी टंचाई दूर करण्यासाठी बोअरवेल खोदली.ज्या गावाला पाणी टंचाईची झळ नागरिकांना कायम सोसावी लागते अशा गावात ही बोअरवेल खोदण्यात आली,तर हे कोणी दुसरे तिसऱ्याने केले नसून नेहमीच आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे सामजिक कार्यकर्ते तथा नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.दरम्यान म्हसकर यांनी घेतलेल्या या निर्णयाचे मात्र आता सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
सध्या महागाई,बेरोजगारीने सर्वसामान्य नागरिक त्रासून गेला,आजही दुर्गम भागात नागरिकाना पाणी टंचाईने बेहाल करून सोडलं.शासन प्रत्येकाच्या घरी पाणी योजना पोहचली पाहिजे म्हणून प्रयत्नशील आहे,विविध योजना राबवत आहेत.परंतु त्या योजना पोहचतील ही. पण केव्हा. हा देखील प्रश्नच?अशातच आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या कर्जत तालुक्यात आजही दुर्गम परिसरात पाणी समस्या आहे,विहिरी,नद्यांनी केव्हाच तळ गाठला अशातच भर डोक्यावर तळपता सूर्य आग ओकत आहे.
पायाखालची जमीन तापून अंगाची लाहीलाही होत असताना पाण्याच्या शोधात कोसोदूर आदिवासी बांधवांना घर सोडून जावे लागत आहे.परंतु आता हे कुठे तरी थांबले पाहिजे म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा भाजपचे नेते मंगेश म्हसकर यांनी समाजप्रति असलेली जाणीव आपले कर्तव्य लक्षात घेता स्वतः पुढाकार घेवून ज्या ग्रामीण भागात नेहमीच पाण्याची समस्या नागरिकांना आदिवासी बांधवांना भेडसावत आहे अशा ठिकाणी स्वखर्चाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बोअरवेल खोदून देण्याचे काम हाती घेतले आहे,
त्यासाठी त्यांनी वाढदिवसाच्या दिनी श्रीफळ वाढवून कामाला सुरुवात देखील केली आहे.एका गावात ही बोअरवेल खोदली जाणार नसून तब्बल पाच ठिकाणी यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.नेरळ जिल्ह्या परिषद वार्ड मधील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाल्मिकी नगर,तर कोंबालवाडी डोंगरे चाळ,भडवळ-दामत ग्रामपंचायत हद्दीतील पातळीचा माळ,भडवळ धनगर वाडी तर शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीस गाव या पाच ठिकाणी गावची पाणी समस्या दूर करण्यासाठी म्हसकर यांनी प्रयत्न केला दरम्यान यावेळी उपस्थित ग्रामस्थ यांनी इतर राजकीय पुढारी वाढदिवसानिमित्त सामने ठेवून पैशाची उधळण करतात असे म्हणत म्हसकर यांच्या कामाचे कौतुक केलं.
दरम्यान या कार्यक्रमावेळी भाजप नेते नितीन कांदलगावकर,राजेश भगत,प्रमोद पाटील,नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी,नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर,पंचायत समितीचे सदस्य नरेश उर्फ पपु मसणे, ग्रामपंचायत सदस्य राजन लोभी, संतोष शिंगाडे,श्रद्धा कराळे,जयश्री मानकमे,शिवाली रासम यांसह प्रज्ञेश खेडकर,नरेंद्र कराळे,केतन पोतदार,अनेक भाजप व स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
यावेळी नेरळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेरळ सम्राट युवक मंडळाला स्पीकर व संतरंज्या भेट स्वरूपात देण्यात आल्यात.मंगेश म्हसकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यानी त्यांच्या निवासस्थानी देखील यावेळी गर्दी केलेली दिसली.यावेळी अनिल पटेल, अनिल जैन,संकेश गदिया,विमल चारभुजा हे कार्यकर्ते देखील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले होते.
0 Comments