दत्तात्रय शेडगे
खोपोली : १ मे,
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव १ मे रोजी मोठ्या उत्साहात दिमाखात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बोरघाटाचे जनक असणारे वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव देवस्थान कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. पशुसंवर्धन दुग्धपालन व मत्सविकास मंत्री आमदार महादेव जानकर यांनी वीर हुतात्मा शिंग्रोबाचा उत्सव १५ वर्षापूर्वी सुरु केला असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिंग्रोबा देवस्थान कमिटीच्या वतीने आजही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे, संस्थापक बबन शेडगे -बबन खरात - बाळासाहेब झोरे - बाळासाहेब आखाडे , दिपक आखाडे ,नामदेव हिरवे आदी प्रमुखासह उत्सव कमिटीचे बबन जानकर, रामभाऊ कोकरे, दत्ता शेडगे, लक्ष्मण बावधाने, बाळासाहेब आखाडे, पांडुरंग झोरे, भिमा शिंगाडे, धाऊ आखाडे, राम शेडगे, एकनाथ घाटे, इश्वर गोरे, बापू बावधने, मारुती शेडगे, विठ्ठल बोडेकर, रामदास जानकर, संतोष गोरे, बाळू शेडगे, भाऊ शेडगे पदाधिकारी सदस्यांनी व समाज बांधवांनी मेहनत घेतली होती.

१ मे रोजी सकाळी ६ ते ८ महाअभिषेक व होमहवन, सकाळी ८ ते ९ श्री सत्यनारायण महापूजा - देवस्थान कमिटीचे संस्थापक तथा आदर्श सरपंच बबन खरात यांच्या हस्ते करण्यात आली, सकाळी ९ ते ११ शिग्रोबा देवाची पालखी - शिळफाटा येथून खोपोली बाजारपेठेतून शिंग्रोबा मंदिरा पर्यंत डीजेच्या तालावर फटाक्याच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली .असून सकाळी १० ते १२ रायगड भूषण ह.भ.प.काशिनाथ महाराज वाघुले यांचे किर्तनरुपी सेवा, दुपारी २ ते ३ महिलांसाठी हळदी कुंकू, दुपारी १ वाजता मान्यवरांचा सत्कार व स्वागत सोहळा, दुपारी २ ते ५ महाप्रसाद, दुपारी ३ वाजता गजानृत्य तसेच ६ वाजता शिग्रोंबा मंदिर येथे महाआरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील, मनीष यादव, भाऊसाहेब आखाडे, अनिल गायकवाड, जे पी पाटील, ललित पाटील, चंद्राप्पा अनिवार, राजन सुर्वे, नितीन पवार, विनायक तेलवणे, देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे, संस्थापक बबन शेडगे , बबन खरात ,बाळासाहेब झोरे बाळासाहेब आखाडे - दिपक आखाडे नामदेव हिरवे आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने अनेक समाज बांधवासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी रायगड भूषण ह.भ.प.काशिनाथ महाराज वाघुले व त्यांच्या सहकार्यानी किर्तन करत यात धनगर वीर हुतात्मा शिंग्रोबाचा इतिहास सगळ्या आलेल्या समाज बांधवांना समजावून सांगितल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
0 Comments