खालापुरात हाल येथे गर्भवती गाय आणि एका वासरू ची हत्या,महड ग्रामस्थ आणि बजरंग दल ,विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक

 



प्रशांत गोपाळे 
खोपोली : ३ मे, 
             खालापूर तालुक्यातील हाल खुर्द  हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याची बुधवारी सकाळी घडली असून महड गावातील गोठ्यात बांधलेली गाय आणि तिचा वासरू या दोघांची चोरी करून हाल गावात सुमसान जागेत एक पत्र्याच्या खोलीत हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे  गायी मालकाच्या गोट्यातील गाय व वासरू नसल्याचे  सोमवारी सकाळी लक्षात आल्याने शोधाशोध करीत असताना मंगळवारी सकाळच्या दरम्यान शोध मोहिमेवर असताना  या पत्र्याच्या शेड मध्ये गाय व वासरू मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात दोन्ही गुरे नजरेस पडल्याने ही हदय हेलावणारी घटना समोर आली.

                महड गावातील ग्रामस्थ व बजरंग दल कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होऊन खालापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले  व  आरोपीस अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली पोलिसांनी तात्काळ जागा मालकाला ताब्यात घेतले  मात्र नागरिकांचा रोष वाढतच गेला येथील गुरांची  कत्तल करण्यासाठी तयार केलेले  सदरचे शेड हटविण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आणि नागरिकांचा ही संयम सुटत चालल्याने नागरिकांनीच  हे पत्र्याचे शेड उध्वस्त करण्याचे पाऊल उचळल्याने पोलिसांनी जमावाला अडवून पत्र्याचे तात्पुरते तयार केलेले शेड हटविण्यात आले मात्र तरीही जमाव शांत होत नसल्याने   यानंतर आर सी एफ जवान व पोलीस दल तैनात करून जमाव पागविण्यात आला 

           महड गावातील शेतकरी तुषार दत्तू पाटील यांच्या मालकी ची गाय आणि तिचे लहान वासरू गोठ्यात सोमवारी  बांधले होते सदर ची गाय ही गर्भवती (गाभण) होती रात्रीच्या दरम्यान सदरच्या गायीची व वासरू सोमवारी रात्रीच्या दरम्यान चोरी झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्याने शोधा शोध सुरू केली असता मंगळवारी सकाळी मालराणावर एक पत्र्याचे शेड मध्ये डोकावल्याने सदरचे गाय व वासरू मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याने पाटील यांच्या काळजाचा ठोकाच चुकला या घटनेची माहिती महड गावातील ग्रामस्थाना दिल्याने मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले त्यांनतर बजरंग दलाचे कार्यकर्ते ही दाखल झाले सदरचा प्रकार पाहिल्यानंतर सर्वांच्या संताप अनावर झाला.                                                                   

  काही काळ या प्रकाराने मोठा गोधळ निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी  प्रभारी पोलीस उप विभागीय अधिकारी विजय लगारे  खालापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व सह्य पोलीस निरीक्षक आरोठे व सहकारी कर्मचारी वर्गाने जमावाला शांत केले मात्र सदरचे सर्वच  शेड तोडावे अशी हल्लाबोल करीत कार्यकर्त्यांनी केल्याने शेवटी पोलीस बाळाचा वापर करावा लागला तर जेसीबी ने सदरचे मयत गुरे दफन करण्यात आले व आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला या घटने बाबत चौकशी नंतर समंधित आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी नागरिकांसमोर सांगितले यावेळी महड ग्रामस्थ व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपीला कडक शासन करावे अशी मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर