दीपक जगताप
खालापूर : २०,
मे, सेंड जोसेफ लोधिवली येथे नुकताच दहावीचा निकाल लागला असल्यामुळे या मध्ये कर्जत मुद्रे बु. येथिल आर्या हरिश्चंद्र दाभणे हिने तृतीय क्रमांक पटकविल्यांने तिचे सर्व स्थरांतून कौतुकांचा वर्षाव होत आहे.आर्या ही पहिली पासून प्रथम क्रमांक पटकावित असल्यामुळे त्यांनी घेतलेली दहावीला मेहनत मुळे यश प्राप्त झाले आहे.विशेष म्हणजे आर्या हिने कोणतेही क्लासेस न करता घरीच आभ्यास करुन ९४% मार्क प्राप्त केले आहे.
आर्या हिने सेंड जोसेफ लोधीवली या शाळेमध्ये तृतीय तसेच कर्जत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्यांने तीला सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आश्या विविध मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,आर्याचा स्वाभाव शांत मात्र,आभ्यासामध्ये सातत्याने चिकाटी असल्यामुळे दिवसांतून अनेक तास आभ्यासांवर भर देण्यात ती सदैव तत्पर असायची,आज तालुक्यात तीच्या नावांचा डंका या तालुक्यात वाजत आहे.
आपण शिक्षण घेवून पुढे काहीतरी बनविण्यांचे स्वप्न मनाशी बाळगून सातत्याने आभ्यासात भर देण्यात आले.आणी आज या शाळेमधून तृतीय क्रमांक मिळविला,मुले खूप हुशार असतात.मात्र त्यांस मार्गदर्शन वेळेवर होणे गरजेचे आहे.मात्र आर्या या सर्व बाबीचा आभ्यास करुन आज तीने स्वताला सिद्ध केले आहे.
0 Comments