दैनंदिन जिवनात सायकलीचा वापर,वयाच्या ७४ वर्षी ही सुदाम थोरवे शेकडो मैल प्रवास सुरळीत


 पाताळगंगा न्यूज                                        वानिवली  : ५ मे, 

          दैनंदिन जिवनात विविध वाहतुकीच्या साधनांचा वापर वाढला आहे,की कोणत्याही ठिकाणी पोहचण्यासाठी अल्प वेळातच माणूस नियोजित वेळेवर पोहचत असतो.मात्र आज वेगवेगळ्या प्रकाराचे वहान असतांना ही सुद्धा त्याचा वापर न करता, खालापूर तालुक्यातील वानिवली येथिल असलेले सुदाम कोंडू थोरवे वय वर्षे ७४ असूनही विविध ठिकाणी जाण्यासाठी तसेच दैनंदिन जिवनात  सायकलीचा वापर करीत आहे.यामुळे शारीरिक व्यायाम तसेच शरीर निरोगी राहण्यांस  मदत होत आहे.असे मत यावेळी त्यांनी बोलतांना व्यक्त केले.
                     गेली २५ ते ३० वर्ष सायकली वरुन प्रवास करीत असतांना शारीरिक व्यायम सोबत इंधनची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले.शिवाय सायकल म्हटली की मेन्टनेस कमी,शिवाय एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागतो.मात्र प्रवास हा सुखकर असतो.पूर्वी वहाने अल्प प्रमाणात असल्यामुळे अनेक जण सायकलीने प्रवास किंवा बैलगाडी,किंवा पायी प्रवास केला जात होता.आता विविध वाहतुकीची साधने आल्यामुळे सायकल मागे पडत चालली आहे.मात्र काही लोक सायकलीचा उपयोग व्यायाम व्हावे या दृष्टीकोणातून वापरतात.
               सुदाम थोरवे हे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलीचा वापर करतात. विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचे सहकार्य सातत्याने लाभत आहे. आपण सायकलीने प्रवास केल्यांस त्यांस उत्तम आरोग्य लाभेल शिवाय इंधन टाकून वाहानामधून निघणाऱ्या वायू पर्यावरणात मिसळत असतो मात्र सायकल ही फक्त शारीरिक श्रमावर चालत असते.या मुळे आजपर्यंत माझी प्रकृती उत्तम असल्यांचे सुदाम थोरवे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. 



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर