दीपक जगताप खालापूर : ६ मे,
खालापूर तालुक्यातील हाल खुर्द हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, बुधवारी सकाळी महड गावात गोठ्यात बांधलेली गाय आणि तिचा वासरू या दोघांची चोरी करून हाल गावात सुमसान जागेत एक पत्र्याच्या खोलीत हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. मालकाच्या गोट्यातील गाय व वासरू नसल्याचे सोमवारी सकाळी लक्षात आल्याने शोधाशोध करीत असताना मंगळवारी सकाळच्या दरम्यान शोध मोहिमेवर असताना या पत्र्याच्या शेड मध्ये गाय व वासरू मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात दोन्ही गुरे नजरेस पडल्याने ही हदय हेलावणारी घटना समोर आली.गो मातेच्या हत्येच्या निषेधार्थ खालापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना खालापूर सकळ हिंदू समजाकडून देण्यात आले निवेदन
खालापूर तालुका सकळ हिंदू समाज ,खालापूर तालुका महाराष्ट्रवारकरी महामंडळ संप्रदाय, ,विश्वहिंदू परिषद कोकण प्रांत, बजरंग दल, वेध सह्याद्री व वावोशी छत्तीशी विभाग यांच्या वतीने आज खालापूर तहसीलदार व खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.दिवसा पूर्वी महड येथे हाल गावामध्ये घडलेल्या गो मातेच्या हत्येच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले असून आरोपींला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच असे प्रकार घडू नये, म्हणून शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले.
यावेळी शशिकांत मोरे,महेश पाटील, संदेश पाटील, आकाश घरडे,जयेंद्र पाटील,दिनेश महाडिक,ज्ञानेश्वर पाटील,काशिनाथ पार्टे,पंकज पालांडे,रुपेश लबडे,सूर्यकांत लोते,भगवान देशमुख,संदीप सुर्वे,योगेश कदम,हनुमंत लबडे,
यावेळी शशिकांत मोरे,महेश पाटील, संदेश पाटील, आकाश घरडे,जयेंद्र पाटील,दिनेश महाडिक,ज्ञानेश्वर पाटील,काशिनाथ पार्टे,पंकज पालांडे,रुपेश लबडे,सूर्यकांत लोते,भगवान देशमुख,संदीप सुर्वे,योगेश कदम,हनुमंत लबडे,
0 Comments