दीपक जगताप
खालापूर : ३ मे
वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली आयोजित नाइट क्रिकेट भव्य दिव्य स्पर्धा अतिशय उत्साहाने पार पाडण्यात आल्या.या स्पर्धेकरिता प्रथम २४ संघानी सहभाग घेतला होता.त्यात खालापुर तालुक्यातील १६ संघ तर ८ हे ओपन महाराष्ट्राचे होते.त्या करिता प्रथम पारितोषिक २ लाख, द्वितीय पारितोषिक १ लाख व तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये या स्पर्धेत प्रथम क्रमांक चे मानकरी ठरला तो शिरशाट स्पोर्ट अहमदनगर,द्वितीय क्रमांक ठरला सावरोली व तृतीय पारितोषिक मिळाले ते साईबाबा नगर खोपोली या संघाला
या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला शिरसाट स्पोर्टस् अहमदनगर संघाचा नितेश कसबे,त्यास सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.तसेत स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरला गौरव घोसालकर सावरोली यांस रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच या स्पर्धेचा मालिकाविर ठरला रायगड चा मास्टर माइंड संजय सोलंकी उर्फ इक्कू यांस स्पर्धेचे आयोजक समीर मसूरकर यांच्या हस्ते टुव्हीलर देऊन त्याचा गौरवण्यात आले. तसेच या स्पर्धेचे समालोचन प्रवीण दुघादे तुषार धुमाळ अभिषेक पाटील व सुत्रसंचालन विनोद सोलंकी याने केले.या स्पर्धा संपन्न होण्यासाठी वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ व वरची खोपोली मित्र मंडळ संजय सोलंकी तुषार धूमाल यानी खुप मेहनत घेतली सर्वाचे या खेळ पुर्ण झाल्यानंतर समीर मसुरकर यानी सर्व खेळाडुंचे आभार व्यक्त केले.
0 Comments