शिवदुर्ग मित्र लोणावळा लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप २०२३ उत्साहात संपन्न

 


गुरुनाथ साठीलकर 
खोपोली : ६ मे ,

शिवदुर्ग मित्र मंडळ - लोणावळा या गिर्यारोहण क्षेत्रात मान्यवर असलेल्या संस्थेकडून "बोल्डरींग चॅम्पियनशिप २०२३ "  या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यात १००   पेक्षाही अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. 
               लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी  स्पर्धेचे उद्घाटन केले. यशवंती हायकर्स खोपोलीचे पद्माकर गायकवाड, कांचनजंगा मांऊटेनियरींगचे दिलीप लागु,  एम.एस.ऐ  चे  नंदु दादा चव्हाण, PEAK चे मुफी लोखंडवाला, अभिजित बर्मन उर्फ बॉंग दादा , ठाण्याचेअद्वेत मळेकर , धनाजी लांडगे, रणजीत शिंदे, सुजित तांबे , अतिन साठे यांनी स्पर्धेदरम्यान उपस्थितीत राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

              अटीतटीच्या स्पर्धेत वयोगट ६  ते ९ वर्ष मुली गटात कु रितिशा ब्रम्हेचा (प्रथम), कु मीरा चौधरी, ( व्दितीय), कु मुक्ता तळवलकर ( तृतीय).
वयोगटातील ६  ते ९  वर्ष मुले गटात कु अनय पिंगळे ( प्रथम ), कु अद्वैत साठे   (व्दितीय), कु सत्यजित नढे ( तृतीय).वयोगट १०  ते १३  मुली गटात कु केया रेवनकर ( प्रथम ), कु अनहिता अरोरा ( व्दितीय), कु काव्या बोरलीकर ( तृतीय) 

                वयोगट १०  ते १३  मुले गटात कु रुद्र  करंदीकर ( प्रथम), कु आयुष पवार ( व्दितीय), कु ध्रुव  साठे ( तृतीय) वयोगट १४  ते  १६  वर्ष मुली गटात कु अभिपशा राॅय  (प्रथम ), कु अन्वी जैन   ( व्दितीय), कु गिरिजा लांडगे ( तृतीय ) वयोगट १४  ते १६  वर्ष मुले गटात कु श्रीहान मराठे ( प्रथम ), कु आयुष वर्तक  ( द्वितीय). कु सोलीन नेवे ( तृतीय). 
खुला गट मुलींमध्ये कु सिध्दी मनेरीकर  (प्रथम ) मी कु श्रृती शिंदे (व्दितीय), कु कृष्णा  पटेल ( तृतीय).
खुलागट मुलांमध्ये कु साहील खान  (प्रथम ), कु अजीज शेख  ( व्दितीय), कु अर्चीत मीटबावकर ( तृतीय)
                 

सर्व विजेत्या स्पर्धकांना आयोजकांनकडून प्रमाणपत्र आणि  सन्मान चिन्हं देण्यात आली.
लहान गटात ६ ते ९  अनुक्रमे प्रथम ५००० /-, द्वितीय ३००० /- तृतीय २००० /-  तर  पुढील सर्व गटांना  अनुक्रमे प्रथम १०००० /-, द्वितीय ७००० /- तृतीय ५००० /-अशी बक्षिसाची रक्कम चेक स्वरूपात देण्यात आली. त्याच सोबत "दि हिमालयीन क्लबच्या" वतीने एक वर्ष  हिमालयीन क्लबची मेंबरशीप, चाॅक बॅग, कॅराबिनर आणि डीसेंडर देखील देण्यात आले. दिपक क्लायबींग इन्स्टिट्यूट व Adtire  यांच्या कडून विजेत्यांना वाॅटर बाॅटल आणि वुडन होल्ड भेट स्वरूपात दीले गेले.

            बक्षीस वितरण समारंभ लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल साहेब, जेष्ठ गिर्यारोहक  कपिलेश्वर रत्नाकर, सौ. विनीता मुनी,  दिव्येश मुनी ,   राजेश गाडगीळ,  राजेंद्र शिंदे, सुरेश दादा गिद. वसुंधरा नितीन दुर्गे, श्री.देविदास कडु इत्यादी मान्यवरांच्या  हस्ते पार पडला . संपुर्ण स्पर्धेसाठी  
                  स्पोर्टस क्लायंबिंग फेडरेशन ऑफ इंडिया, स्पोर्टस क्लायंबिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच  प्राजक्ता घोडे यांनी ज्युरी प्रेसिडेंट म्हणुन काम पाहीले तर श्रीपाद सपकाळ , किशोर चव्हाण, नवनाथ पवार, प्रवीण सावंत यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. रुट सेटर म्हणून राहुल पेंडसे, दिपक पवार, ध्रुव विश्वासराव यांनी काम पाहिले. कृष्णा ढोकळे, समिरन कोल्हे, वर्षा खाटींग , हनुमान खाटींग यांनी शिवदुर्ग टीम बरोबर मदतनीस म्हणून काम पाहिले.

                 या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अभिषेक कुलकर्णी, भिवाजी शिंदे, उमेश तळेगावकर, ब्रिंदा अनिश गणात्रा, समीर राऊळ, हर्षदीप पवार, परेश बडेकर, सनी दळवी, दत्ता येवले, देविदास कडु, आदित्य व्यास, जय घोणे, नितीन दुर्गे, सुभाष डेनकर, निवृत्ती दुडे, राजेंद्र शिंदे, अजय राऊत, डॉ रुपेश खेडेकर, दिव्येश मुनी आणि लोणावळा नगरपालिका यांचे बहुमोल सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर