निवृत्त मुख्याध्यापक महादेव कर्णुक यांचे निधन

 


जयवंत माडपे 
खोपोली : ९ मे 

  
         नगरपरिषद शिक्षण मंडळातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव गणपत कर्णुक (८८) यांचे काल सायंकाळी वृद्धापकाळामुळे खालापूर तालुक्यातील बीड (खालापूर) या त्यांच्या गावी दुःखद निधन झाले. भाजपा तालुका कामगार आघाडी संयोजक अनिल करणुक यांचे ते वडील होते,त्यांच्या पक्षात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कर्णूक यांच्या निधनामुळे एक वारकरी, साधक व आदर्श मुख्याध्यापक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा मोकल यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. बीड स्मशानभूमी अंत्ययात्रे विधीला असंख्य ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर