समाधान दिसले
खालापूर : ९ मे,
हाळफाटा मार्गे अंजरुण - केळवली - पळसदरी - कर्जत फाटा मार्गाचे रुंदीकरणाचे काम MMRDA च्या माध्यमातून टी.एन.टी.इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून होत असताना,डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव या वर्दळीच्या स्टाँपवर गतीरोधक न टाकल्यामुळे वाहन चालक वेगाने वाहन चालवत असतात. त्यामुळे दररोज असंख्य लहान - मोठे अपघात होत असताना नुकताच ७ मे रोजी अंजरुण गावाच्या हद्दीत कारचा व दुचाकीचा अपघात झाल्याने या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान होत दुचाकी वरील प्रवाशांना आणि वाहन चालकाला दुखापत झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले असून याबाबत माणकीवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विदयमान सदस्य विकास रसाळ यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, डोळवली - माणकीवली फाटा - अंजरुण गाव या वर्दळीच्या स्टाँपवरील अपघात रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर गतीरोधक टाकावे जेणेकरून येथून जाणाऱ्या प्रवासी व वाहन चालकांचा प्रवास सुखकर होईल अशी मागणी माजी उपसरपंच विकास रसाळ यांनी केली आहे.
खालापूर तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील सतत वर्दळ असणाऱ्या डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव या स्टाँपवरील रस्त्यावर गतीरोधक टाकण्यात आले नसल्याने वाहन चालक वेगाने वाहन चालत असल्याने या ठिकाणी रस्ता क्रॉस करताना विद्यार्थी, चाकरमानी, महिला, प्रवासी, वाहन चालक यांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार व अपघाताला आळा बसावे या उद्देशाने तातडीने डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव स्टाँपवरील रस्त्यावर गतीरोधक टाकण्यात यावे अशी मागणी माणकीवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विदयमान सदस्य विकास रसाळ यांनी केली आहे. तर लवकरात लवकर याठिकाणी संबंधित प्रशासनाने गांभीर्य घेत गतीरोधक टाकावे, जेणेकरून अपघाताला आळा बसून त्यातुन सर्वाचा प्रवास सुखकर बनेल.
तर रविवारी ७,मे रोजी अंजरुण गावाच्या हद्दीत कारचा व दुचाकीचा अपघात झाल्याने या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान होत दुचाकी वरील प्रवाशांना आणि वाहन चालकाला दुखापत झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले असून याठिकाणी गतिरोधक असते, तर अपघाताला आळा बसला असता असे मत स्थानिकांनी व्यक्त यावेळी व्यक्त केले. त्यामुळे संबंधित प्रशासनाने गांभीर्य घेत याठिकाणी गतीरोधक टाकावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
चौकट -
माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव याठिकाणी गतीरोधक न टाकल्याने याठिकाणाहून वाहने भरधाव वेगाने जात असून याठिकाणी दररोज अनेक लहान मोठे अपघात घडत असल्याने स्थानिकांमध्ये प्रवास करताना भीती निर्माण होत आहे. त्यामुळे गतीरोधक लवकरात लवकर टाकणे गरजेचे आहे, जेणेकरून स्थानिकाची भीती दूर होऊन अपघाताला याठिकाणी आळा बसेल.
चंदन भारती (सरपंच - माणकीवली ग्रामपंचायत)
चौकट -
डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव या मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे, त्यामुळे ग्रामस्थाचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी तातडीने गतीरोधक टाकणे गरजेचे आहे, अन्यथा काहीचा निष्पाप बळी जाऊ शकतो.
विकास रसाळ (मा.उपसरपंच - माणकीवली ग्रामपंचायत)
0 Comments