मुबंई पुणे जुन्या महामार्गावर कंटेनरने दोन पिकअपला धडक देऊन कंटेनर पिकअपवर पलटी, चालक ठार तर 2 जखमी यात एका शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश , तर दुसरी पिकअपही पलटी


दत्तात्रय शेडगे                                                                  खोपोली ,२४ जून ,

                    मुबंई पुणे जुन्या महामार्गावर अंडा पॉइंड जवळ एका ब्रेक फेल कंटेनरने समोरील दोन  पिकअपला धडक देऊन कंटेनर एका पिकअप वर पलटी  झाला, यात पिकअप मध्ये तीन जण अडकले होते, यात पिकअप मधील चालक जागीच ठार तर दोन जण जखमी झाले आहेत, यात एक जण शाळेचा विद्यार्थी होता, 

              लोणावळा वरून मुबंई कडे जाण्यासाठी खंडाळा कडून दस्तुरी कडे  उतारावर भरधाव वेगात कंटेनर  आला असल्याने त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने अंडा पॉइंड जवळील वळणावर आला असता समोरील दोन पीक अप ला धडक देऊन एका पिकअप पलटी होऊन,  यात  , यात पिकअप चालक आणि दोन प्रवाशी अडकले होते यात चालकाचा जागीच मृत्यू झाला       


                       तर दोन प्रवाशी जखमी झाले आहेत, या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, अपघात ग्रस्त टीम चे सदस्य , देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पिकअप मध्ये अडकलेल्याना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले, या   पीकअप मध्ये  एक शाळेचा विद्यार्थी असून एक प्रवाशी होता,

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर