पाताळगंगा न्यूज तळवली : २३ जून, सामाजिक कार्यकर्ते अतुल दत्तात्रेय मालकर हे जनतेच्या कामात सातत्याने अग्रेसर असतात.जनतेचे प्रश्न त्यांची समस्या मार्गी लावण्यांचे काम ते सातत्याने करीत असतात.नुकताच त्यांच्या पत्नी अश्विनी अतुल मालकर हीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.रायगड जिल्हा परिषद शाळा तळवली या मराठी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच मानिकनगर येथील पन्नास आदिवासी बांधव वर्गाना आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले यामध्ये ५ लाखापर्यंत वैद्यकीय सुविधा मिळणार आहे.
आज वाढदिवस विविध माध्यमातून साजरा करीत असतात.मात्र समाज्यामध्ये असे काही व्यक्ती आहेत ते आपला वाढदिवस गोर - गरीब किंवा शाळकरी मुलांच्या मध्ये काही भेट वस्तू देवून साजरा केला जातो. यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा तळवली येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी,शिवाय शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची घरची स्थिती बिकट असते.यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा या उद्दात हेतुने वह्या वाटप करण्यात आल्या
तसेच मनिक नगर येथिल अदिवासी बांधवांना आयुष्यमान कार्ड वाटप केले.तसेच त्यांचे महत्व सांगितले यावेळी जमलेल्या महिला वर्गांनी त्यांचे आभार व्यक्त केले.तसेच कोरोनांच्या काळात अतुल मालकर यांचे काम कौतुकास्पद असल्यामुळे त्यांस कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले होते.त्याच बरोबर नुकताच त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून भारत गौरव पुरस्कार देण्यात आला.त्यांचे काम हे समाज्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्यामुळे अतुल मालकर यांच्यावर कौतुकांची छाप पडत आहे.
. ,
0 Comments