आप जन समस्या निवारण शिबिराचे १०० व्या दिवसाचे निमित्त साधून आप ने एकाच दिवसात जोडले रोजी १२४ नवीन सदस्य


 पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                              खोपोली : २४ जुन 


झाडाखाली सातत्यपूर्ण १००  दिवस जन समस्या निवारण शिबिर चालवणाऱ्या आम आदमी पार्टीची होणार विक्रमात नोंद...
              आप आदमी पार्टी, खोपोली खालापूरच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,खोपोली येथे झाडाखाली जन समस्या निवारण शिबीर बुधवार दि १५  मार्च २०२३  पासुन दररोज सकाळी ९: ००  ते १० : ००  या वेळेत सुरु करण्यात आले. या शिबिरात नागरिकांकडून लेखी तक्रारी घेवुन समस्यांचे निवारण करण्यात आम आदमी पार्टीला यश येत असल्याने सदस्यांचा कल आम आदमी पार्टी कडे वाढलेला आहे.आजपर्यत ४०  पेक्षा ज्यास्त लिखित तक्रारी प्राप्त झाल्या असुन नागरिकांचे तक्रार निवारण होत आहे. ज्यांना येणे शक्य होेत नाही ते नागरीक www.aapkhopolikhalapur.org या वेब साइटवरून देखील तक्रारी दाखल करीत आहेत याचसोबत नवीन सदस्य नोंदणी देखील उत्स्फूर्तपणे सुरु आहे.

                      २३  जुन २०२३  रोजी झाडाखाली असणाऱ्या आप जन समस्या निवारण शिबिरास १०० दिवस पूर्ण होत असल्याने यादिवशी किमान १०० सदस्य करण्याचा संकल्प आप ने केला होता त्याप्रमाणे पदाधिकारी यांनी मेहनत करुन १२४ नवीन सदस्य बनविण्यात यश आलें आहे. संघटनेची कार्य करण्याची पद्धत जनमानसाना आवडत असुन नुकत्याच आपच्या दोन यशस्वी आंदोलनामुळे आधाराचे स्थान म्हणुन जनतेला हक्काचे व्यासपीठ लाभत आहे.संपूर्ण भारतात रोज न चुकता झाडाखाली असणारे हे पहिले राजकीय शिबिर असुन लवकरच याची जागतिक विक्रम म्हणून नोंद होणारं आहे.
                      दिनांक २३ जुन रोजी आप चे पदाधिकारी व नवीन सदस्य एकत्र येत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.नवीन सदस्यांना प्रवेश देत असताना आपचे शिवा शिवचरण यांची खालापूर तालुक्याचे माथाडी कामगार प्रमुख म्हणुन नियुक्ती करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.
आपचे उप जिल्हा प्रमुख डॉ. रियाज पठाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संघटन कौशल्य असणारे आपचे तालुकाप्रमुख डॉ.शेखर जांभळे,खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दिन खान तसेच दिपक कांबळे, गौरी येरुनकर,कविता खरे,शिवा शिवचरण, शाहनवाज सय्यद,विवेक वाघमारे,धर्मेंद्र चव्हाण,चंद्रप्रकाश उपाध्याय,भगवान पवार,शादाब सय्यद,प्रवीण कोल्हे,सोनी यादव यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
                        आम आदमी पार्टी समाजाच्या हितासाठी करत असलेले काम हे जनतेच्या न्याय हक्कासाठी आहे.जनतेच्या नागरी समस्या सोडवून दिलासा देण्याचे काम भविष्यातही प्रभावीपणे सुरु राहील.आपच्या या यशात कळत नकळत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद यानिमित्ताने आपचे खालापूर तालुका अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर