नागरिकांचा आधार कार्ड काढण्यासाठी कमल जाधव यांचा पुढाकार,आरोग्य पॉलीसी,बचट गटाविषयी मार्गदर्शन


माजगांव/ आंबिवली                                                       
१३ जून,

               ग्रूप ग्राम पंचायत माजगांव या परिसरात  शेकडो लहान मुले यांचा आधार कार्ड काढले गेले नव्हते,मात्र शाळा सुरु झाली की आधार कार्ड अनिवार्य झाले आहे.यामुळे शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व मुलांचे आधार कार्ड काढण्यात आले.यामध्ये पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत असलेल्या मनाली जोशी यांच्या मार्गदर्शन  आणी महिला बचत गट अध्यक्षा कमल जाधव यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले.यावेळी या परिसरातील शेकडो लहान मुले महिला,पुरुष वर्ग यांनी या सेवेचा लाभ घेतला.
                   

                हा कॅम्प आंबिवली येथे घेण्यात आला.यावेळी आधार कार्ड मोबाईल ला लिंक करणे,लहान मुलांचे आधार काढणे,किसान योजना बंद झालेले, खाते पोस्टामधून काढण्यात आले.त्याच बरोबर नविन किसान योजनेचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या खात्यात पैसे यावेत यासाठी सहकार्य करण्यात आले.नुकताच कमल जाधव यांना महिला वर्गांसाठी विविध उपक्रम राबवित असतांना त्यांस ग्रूप ग्राम पंचायत माजगांव येथे पुन्यश्लोक आहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

                       जिवनांत स्वताच्या सुरक्षा समवेत कुटुंबाचे सुरक्षा किती महत्वाचे यांचे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मेरा गाव मेरी पहचान युवा परिवर्तन, नव निर्माण जनकल्याण सहाय्यता समिती यावेळी २५० हून अधिक पॉलिसी काढण्यात आले.त्याच बरोबर अभा हेल्थ १५० नागरिकांचे काढण्यात आले. ई श्रम कार्ड शेकडो जणांचे काढण्यात आले. 
महिला वर्गांस बचत गटाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.आज जवळ - जवळ ५३ बचत गट सुरु केले आहेत.त्याच बरोबर श्री कृपा बचत गटाच्या माध्यमातून महिला वर्गान सक्षम करण्यात येत आहे.शिवाय महिला वर्गांसाठी स्वताच्या पायावर उभे राहता यावे यासाठी शिवण क्लास से प्रशिक्षण अल्प दरात तसेच प्रमाण पत्र प्रदान करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन