दत्तात्रय शेडगे खोपोली : १० जून
मराठी अस्मिता युवा प्रतिष्ठान खालापूर तालुका अध्यक्ष पदी अक्षय सकपाळ यांची नुकतीच निवड करण्यात आली, यावेळी उपस्थित मान्यवरांची त्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मराठी अस्मिता युवा प्रतिष्ठानचा मेळावा उरण मोठी जुई येथे नुकताच पार पडला असून प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चेतन आगलावे यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडी करण्यात आल्या. यावेळी खालापूर तालुका अध्यक्षपदी अक्षय पांडुरंग सकपाळ, उपाध्यक्ष आदित्य विजय झेमसे, खोपोली शहर अध्यक्ष पदी योगेश राठोड, उपाध्यक्ष आदेश मिलींद मोहरे, नवी मुबंई ठाणे विभाग अध्यक्षपदी मकरंद गोपाळ पालांडे, कोकण विभाग संपर्क प्रमुख श्रीधर पाटील, पेन महिला विभाग अध्यक्षा मोहिनी डंगर यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या,
0 Comments