शेखर जांभळे खोपोली : १४ जुलै,
आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वात पक्षाने राज्यात पंढरपूर ते रायगड अशी दहा दिवसांची स्वराज्य यात्रा काढली होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा संकल्प साकारण्यासाठी रायगडापर्यंत प्रयाण केले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच आम आदमी पार्टीने अशी यात्रा काढली ज्यात भक्ती आणि शक्तीचा संगम होता. या स्वराज्य यात्रेदरम्यान दोन लाखाहून अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला होता.
आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाब मध्ये शाळा, दवाखाने मोफत वीज, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शहीद जवानांच्या परिवाराला एक कोटी मानधन, चांगले रस्ते,भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, घरोघरी सेवा वितरण, भ्रष्टाचारासाठी टोल फ्री क्रमांक,देवदूत योजना, महिलांना सरकारी बसमध्ये मोफत प्रवास, सीसीटीव्ही कॅमेरे असे एक ना अनेक सुविधा पुरवत आहे.
कोकणात सुध्दा अनेक आशा समस्या आहेत. रिफायनरी चा विषय असो, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, पिण्याचे पाण्याची समस्या, रस्ते, शाळा, रुग्णालय तसेच अनेक समस्यांवर काम करण्यासाठी आम आदमी पार्टी कोकणात संघटन मजबूत करीत आहे. स्वराज्य संवाद अभियाना अंतर्गत पनवेल,खालापूर,खोपोली, अलिबाग सुधागड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम आदमी पार्टी आपला विस्तार करीत आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण मोठ्या संख्येने आम आदमी पार्टी बरोबर जुळावे व आपल्या समस्यांना वाचा फोडावी असे आवाहन स्वराज्य संवादचे कोकण समन्वयक डॉ. रियाज पठाण यांनी केले आहे.
0 Comments