तळा तालुका युवा सेना अध्यक्ष पदी डॉ.अनंत खराडे यांची नियुक्ती


कृष्णा भोसले                                                       
तळा : १६ जून,                                                                      तळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आ.भरतशेठ गोगावले यांच्या विश्वासाखातर शिंदे गट शिवसेनेत नुकताच प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे सहकार्य उपस्थित होते.तळा तालुका युवा सेना तालुका अध्यक्ष पदाची त्यांना तसे निवडीचे पत्र देण्यात आले.शिंदे गट शिवसेनेचे प्रतोद आ.भरतशेठ गोगावले यांचे हस्ते देण्यात आले आहे.                                                          हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्म विर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधिमंडळ पक्ष प्रतोद कार्य सम्राट आ.भरतशेठ गोगावले यांचे मार्गदर्शनाखाली व युवा सेना प्रमुख विकासशेठ गोगावले यांचे सुचनेनुसार डॉ अनंत खराडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.यावेळी युवा सेना रायगड जिल्हा अध्यक्ष विपुल उभारे,सुकुमार तोडलेकर,तळा तालुका शिवसेना अध्यक्ष प्रदुम्न ठसाळ,उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार