कृष्णा भोसले तळा : १४ जून
सोनसडे ग्रामपंचायतीमध्ये मृद व जलसंधारण आराखडा तयार करण्यासाठी मानव ग्रामीण विकास व संशोधन संस्था मृदु व जलसंधारण विभाग प्रकल्प तयार करणारी यंत्रणा पोहचली अन त्या संस्थेने सरपंच तथा समिती अध्यक्षा माधुरी पारावे यांचे अध्यक्षतेखाली सभा घेऊन सोनसडे व कलमशेत या गावाचा आराखडा तयार करुन दोन्ही गावातील सदस्यांना विचार घेऊन माहिती घेतली. या गावाची लोकसंख्या , महिला पुरुष, व्यवसाय, रोजगाराच्या संधी, पाण्याची सोय, जलसंधारचीरथरथ करावयाची कामे, महीला बचत गट, अल्पभूधारक, भूमीहीन अशा लोकांच्या हाताला काय काम देता येईल याची चौकशी केली. शिवार फेरी देण्यात आली. त्याचबरोबर सामाजिक नकाशा, शिवार नकाशा काढण्यात आला शिवार फेरी करुन सर्वानी मनसोक्त विचार मांडले. या समितीत नितीन कोल्हे कार्यकारी अध्यक्ष, नितीन भालेकर अभियंता संचालक, उमाजी भगत, संचालक, नब्युरपॉपठाण, उदलसिंग तारावल,चंद्रकांत सोनवणे, रवि भुते व इतर सामाजिक तज्ञ व पाणलोट तज्ञ उपस्थित होते. यावेळी साठे, ,डेप्युटी इंजिनिअर, आशा मोहिते कृषी तज्ञ, साजन पवार कनिष्ठ अभियंता सारे उपस्थित होते
0 Comments