खोपोली वृत्तसेवा पाताळगंगा न्युज : १६ जून,
प्रसोल कंपनी व्यवस्थापकांनी स्थानिक दहा कामगारांची गुजरात आणि महाड येथील कंपनीत तडकाफडकी बदली करून प्रसोल कंपनीत प्रवेश देण्यास बंदी केली आहे.त्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा आक्रामक पवित्रा घेणार असल्याचा इशारा भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे दिला आहे. खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायत हाद्दीतील प्रसोल केमिकल्स कंपनीत जवळपास ३०० हून अधिक कामगार काम करीत आहेत.यामधील दहा कामगांराची गुजरात आणि महाड येथील कंपनीत तडकाफडकी बदली केली आहे.कामगारांना १५ हाजारांच्या आसपास पगार असल्याने या पगारात बदली केलेल्या ठिकाणी काम करण्यासाठी जावे लागत असल्याने कामगारांनी नकार दिला होता.त्यादरम्यान शिवसेनेने कामगारांची बाजू समजून घेत कारखाना प्रशासनाला धारेवर धरले होते, तर शिवसेनेचे शिष्टमंडळ कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता. गुरूवार दि.१५ जून रोजी सकाळी कामगार कामावर आले असता कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला.त्यानंतर संतप्त कामगारांनी भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्याशी संपर्क करीत होणाऱ्या अन्यायाची कैफियत मांडली.किरण ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसह कंपनीत पोहचले,कामगारांचे कुटूंब कंपनी उपस्थित झाले होते. व्यवस्थापकांशी चर्चा करून तोडगा निघत नसल्यामुळे भाजपाचे शिष्टमंडळ, कामगार वर्ग व पोलीस प्रशासन अशी संयुक्त बैठक खोपोली पोलीस ठाण्यात पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी बोलावली होती. यावेळी भाजपा कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, कोषाध्यक्ष सनी यादव, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील, वारकरी सेलचे प्रमुख काशिनाथ पारठे, किशोर ठाकरे, आनंद निरगुडकर आदीप्रमुख भाजपाचे पदाधिकारी कामगार वर्ग तसेच कंपनी व्यवस्थापनाकडून व्यवस्थापक प्रभू, विलास पाटील, एचआरचे योगेश पाटील आदि उपस्थित होते. वरीष्ठ व्यवस्थापकांशी चर्चा मंगळवरा किंवा बुधवार पर्यत झाल्यावर योग्य निर्णय घेवू अशी सकारात्मक चर्चा झाल्यावर कामगारांनी आपला राग शांत होकार दिला.
चौकट -
प्रसोल कारखान्यातील स्थानिक दहा भुमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजपा यापुढे अधिक आक्रमक होईल आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनी प्रशासनाला भाग पाडेल. तर कामगारांवरील अन्याय भाजपा कदापिही सहन करणार नाही - किरण ठाकरेभाजपा कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख
0 Comments