धामणी येथील विश्वनिकेतन महाविद्यालयात मनसेच्या वतीने मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन


समाधान दिसले                                         खालापूर : १७ जून, 

                  मनसे पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस १४  जून रोजी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आल्याने  मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तर अनेक ठिकाणी अजूनही सामाजिक कार्यक्रम आयोजित करुन राजसाहेब ठाकरे यांच्या दिर्घायुष्यासाठी मनसे पदाधिकारी व कार्यक्रम प्रार्थना करित असताना मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच कामगार सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, खालापूर तालुका अध्यक्ष विजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे खालापूर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष चेतन चोगले यांच्या पुढाकाराखाली सामाजिक बांधीलकी जपण्याच्या हेतूने धामणी येथील विश्वनिकेतन महाविद्यालयात मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन २०  जून रोजी करण्यात येत असल्यामुळे या  शिबिरात लाभार्थी व विद्यार्थी वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन चेतन चोगले यांनी केले आहे.                                                     "शासन आपल्या दारी" व "महाराजस्व अभियान" अंतर्गत शासन व राजकीय - सामाजिक - शैक्षणिक अशा अनेक स्तरावर मोफत विविध दाखले वाटप करण्याचे काम खालापूर तालुक्यात तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याने तळागाळातील लाभार्थी वर्गाला या अभियानाचा लाभ मिळत असल्याने लाभार्थी वर्ग समाधान व्यक्त करित आहेत.                                                                   20 जून रोजी दाखले वाटप करण्यात येत  असून या शिबिरात सर्व लाभार्थी व विद्यार्थी वर्गाने लाभ घ्या असे आवाहन मनसेच्या चेतन चोगले यांनी केले आहे, तर लाभार्थी वर्गाला या शिबिराबाबत अधिक माहिती हवी असल्यास 9561541263 / 7666685159  या नंबर संपर्क असे आवाहन चोगलेंनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण