दत्तात्रय शेडगे खोपोली : १९ जून
पनवेल तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात सारसई भागातील असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागेची वाडी येथे होनेस्टी बिल्डर आणि डेव्हलोपर्स ,सम्यक पेपर एंटरप्राइजेस आणि स्वर्गीय मीना बबन लोखंडे यांच्या स्मृर्तीप्रित्यर्थ गोर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांसह शाळेपयोगी वस्तू वाटप करण्यात आले. तुषार बबन लोखंडे, यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दप्तर, , वह्या, पेन पेन्सिल आदींचे वाटप करण्यात आले यावेळी ७५ विद्यार्थ्यांना या शालेय साहित्यांचा लाभ घेण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश सोनवणे, पौर्णिमा सोनावणे, आपटा ग्रामपंचायत सदस्या संगीता लक्ष्मण बावदाणे, अमोल तिवले, अक्षय झोरे ,रवींद्र ढेबे, सुरज कोकरे आदींसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments