संजय कदम पनवेल : ३० जून
पनवेल जवळील करंजाडे येथील दूधे विटेवरी कॉम्प्लेक्स मध्ये ‘देवशयनी आषाढी एकादशी’ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोसायटीच्या सर्व धर्मीय लहान मुलं आणि मुलींनी विठ्ठलाच्या वारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व महिलांनी फुगडी आणि रिंगण करुन ताळ वाजवून विठ्ठल नामाचा गजर केला. दिंडी साठी पनवेल मार्केट यार्ड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर छान साथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेक पासून सुरुवात झाली. त्यानंतर अभिषेक व पूजा नंतर आरती करण्यात आली. ओंकारेश्वर महिला मंडळाने सूंदर भजन गायले. दुपारच्या वेळी संगीत विशारदक आणि उत्कृष्ट बासरी वादक एकनाथ ठाकूर यांनी भजन गायले. संध्याकाळी कुंडे वहाळ येथील राधाकृष्ण भजनी मंडळ यांचे तसेच सीरवी समाजाच्या महिलांचे भजन झाले. त्यांनतर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोसायटीच्या सर्व धर्मीय लहान मुलं आणि मुलींनी विठ्ठलाच्या वारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व महिलांनी फुगडी आणि रिंगण करुन ताळ वाजवून विठ्ठल नामाचा गजर केला. दिंडी साठी पनवेल मार्केट यार्ड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर छान साथ दिली. दिंडीनंतर महाआरती झाली व त्यानंतर ह.भ.प सौ.वर्षा रानडे -सहस्रबुद्धे यांचे "जनाबाई" हे कीर्तन आयोजित केले होते. अश्याप्रकारे संपूर्ण दिवस विठ्ठल नामात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्स दुमदुमला होता. यामध्ये करंजाडे व पनवेल शहरातील विठ्ठलभक्त सहभागी झाले होते.
0 Comments