हनुमंत मोरे वावोशी / खोपोली : ३० जून
आज सकाळपासूनच खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात पावसाचा जोर वाढण्याचे पाहायला मिळत होता.दुपारनंतर हळूहळू पाऊस वाढत चालला होता तर सायंकाळी जोरात पाऊस सुरू झाला आणि या पावसामुळे खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातही सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळू लागले.काही ठिकाणी अनेक छोट्यामोठ्या नाल्याने धोक्याची पातळी ओळआंडल्यआचए दिसून येत होते.
रस्त्यावरून गाडी तसेच लहान वाहन चालविणे अवघड झाले होते.सायंकाळी मात्र पावसाने कर केल्याचे दिसून आले यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहताना दिसत होते तर काही ठिकाणी पाणी रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहत होते की रस्ता ओळांडणेही अवघड झाले होते.पावसाचा वाढता जोर पाहून खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी लोकांना सुचना देत काळजी घेण्याचे आवाहन केले.
तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या माध्यमातून सर्वत्र सावधान राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले असले तरी शेतावर किंवा नोकरी निमित्ताने बाहेर गेलेल्या लोकांनी पाण्याची पातळी पाहूनच रस्ता ओळांडावा असे आवाहनही तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.
आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता मात्र दुपारनंतर वाढलेला पाऊस हा नदिनाळ्यांची धोक्याची पातळी ओलांडतो की काय असा प्रश्न सर्वांना पडला होता?सायंकाळी साडेपाच नंतर सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र आकार माजवला काही मिनिटात पडलेल्या पावसाने नदी नाळे तुडुंब भरून वाहू लागले तर काही ठिकाणी या नदी नाल्यांचे पाणी पुलावरून तसेच रस्त्यावरून वाहू लागल्याने सायंकाळी घरी परतणाऱ्या लोकांच्या जीविकास धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली होती.
मात्र सव्वा सहा नंतर कमी झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून तसेच पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग मांडावला त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा धोका टळल्याचे चित्र दिसून आले. याबाबत सतर्कतेचा इशारा म्हणून खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी लोकांना सावधान राहण्यास सांगितले असून कोणीही पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असेल त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्याचे धाडस कोणीही करू नये,
गरज भासल्यास तालुका आपत्ती विभागाला संपर्क साधावा आपणास तात्काळ मदत मिळेल असे आव्हान तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.
0 Comments