मनसे विद्यार्थी सेना आयोजित धामणी येथील विश्वनिकेतन महाविद्यालयात मोफत दाखले वाटप शिबिर संपन्न


 समाधान दिसले                                                               खालापूर : २० जून 

                    महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस नुकताच १४  जून रोजी मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध सामाजिक उपक्रमांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला असता याच वाढदिवसाचे औचित्य साधत २०  जून रोजी मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच कामगार सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, खालापूर तालुका अध्यक्ष विजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे खालापूर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष चेतन चोगले यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधीलकी जपण्याच्या हेतूने खालापूर तालुक्यातील धामणी येथील विश्वनिकेतन महाविद्यालयात मोफत दाखले वाटप शिबिर पार पडल्याने विद्यार्थी वर्गाला एकाच ठिकाणी सर्व दाखले मिळाल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले असून मनसेच्या उपक्रमाचे सर्वानी कौतुक केले आहे.                                                                                 या प्रसंगी याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, कामगार सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, खालापूर तालुका अध्यक्ष विजय सावंत, मनसे खालापूर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष चेतन चोगले, सामाजिक कार्यकर्ते संतोष मुंढे, मनसे माथाडी नेते महेश सोगे, महेश पिंगळे, अतुल हाडप, अविनाश देशमुख, शेखर विचारे, अक्षय खेडेकर, विनोद कदम, पंकज छत्तीसकर, सिध्देश आंबेरकर, अंकुश खाडे, प्रपुल्ल साबळे, चेतन महाडिक, कुशल दर्गे, विश्वनिकेतनचे प्राचार्य बी.आर.पाटील, उप प्राचार्य पी कदम आदीप्रमुख मनसेचे पदाधिकारी - कार्यकर्ते व  मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.                                 "शासन आपल्या दारी" व "महाराजस्व अभियान" अंतर्गत शासन व राजकीय - सामाजिक - शैक्षणिक अशा अनेक स्तरावर मोफत विविध दाखले वाटप करण्याचे काम खालापूर तालुक्यात तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना २० जून रोजी मनसे पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मनसे विद्यार्थी सेनेच्या मुख्य आयोजनातून धामणी येथील विश्वनिकेतन महाविद्यालयात मोफत दाखले वाटप शिबिर संपन्न झाल्याने या शिबिराचा विद्यार्थी व  तळागाळातील लाभार्थी वर्गाला लाभ मिळाल्याने मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण