डॉ.शेखर जांभळे रोटरी क्लब ऑफ खोपोली तर्फे सन्मानित...


 पाताळगंगा न्युज  : वृत्तसेवा                           खोपोली : २६ जून 


              रोटरी क्लब ही जगातील नामवंत सामाजिक संस्था म्हणून ओळखले जाते. रोटरी क्लब ऑफ खोपोली ही ५९  वर्ष अविरतपणे समाजसेवेत काम  करणारी सेवाभावी संस्था आहे. दिनांक २५  जून २०२३  रोजी रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने समाजकार्यासाठी दिला जाणारा वर्मा मेमोरियल अवॉर्ड फॉर एक्सेलन्स इनवोकॅशनल सर्व्हिसेस हा २०२२- २०२३  चा मानाचा पुरस्कार खोपोलीतील नामवंत समाजसेवक डॉ.शेखर अलका तुळशीदास जांभळे यांना दिला गेला आहे. खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करणाऱ्या या लोकसेवकाला समाज पुरस्कार दिला अशीच भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे. 
                 मुळातच डॉ. शेखर जांभळे यांची सुरुवात रोट्रक्ट क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून झाली.तिथूनच त्यांच्या खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनाला सुरुवात झाली.रोट्रक्ट क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी वाहिल्यानंतर लायन्स क्लब ऑफ खोपोली मध्ये सदस्यता घेतली.तेथेही त्यांनी २०१५- २०१६ रोजी त्या ठिकाणी आपला समाजकार्याचा दबदबा राखीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारख्या उपक्रमातून आपल्या नेतृत्वाची कर्तृत्वाची व कल्पकतेची चुणूक साऱ्या जगाला दाखवून दिली.
             विशेष म्हणजे नोकरी सांभाळून समाज कार्य करणाऱ्या शेखर जांभळे  यांनी २०१६  नंतर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि यासोबत समाजसेवा करीत आहे.परंतु आज मागे वळून पाहता हा निर्णय त्यांना समाजामध्ये वेगळे स्थान घेऊन गेला एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणून डॉक्टर शेखर जांभळे यांच्याकडे बघितलं जातं त्यांच्यामार्फत नगरपालिका दवाखाना येथे साडे चार वर्षांपासून सुरू असलेली अन्नसेवा, निधन झालेल्या व्यक्तींना घरापासून स्मशानापर्यंत सोडण्यासाठी असलेली स्वर्गरथ सेवा, त्यांच्यामार्फत चालणाऱ्या अनेक सेवा या सतत न थकता चालू असतात                                                             खोपोलीकरांना नव्हे तर सर्वांनाच कुतूहल आहे.रात्री अपरात्री २४  तास जनतेच्या सेवेत रुजू असलेले डॉ. शेखर जांभळे हे काम सामाजिक बांधिलकी मानून करतात. नुकतेच त्यांचे राजकारणातील पावूल हे भविष्यात खोपोलीला  द बेस्ट सिटी चे वळण देणारे आहे.डॉ.शेखर जांभळे हे समाजातील अनंत घटकांना मदत करणाऱ्या आशिर्वादाचे धनी आहेत.
सदर पुरस्कारा बद्दल समाजातील विविध नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर