दत्तात्रय शेडगे खोपोली : २५ जून,
कर्जत खालापूर विधानसभा व उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याने ठाकरे गट सेनेतील शिवसैनिक - युवासैनिकांमध्ये आनंदाचे असताना २५ जून एप्रिल रोजी चौक परिसरातील भाजपाचे दिग्गज नेते उत्तम भोईर यांनी आपल्या जवळपास :४०० हून अधिक सहकार्याना सोबत घेत तसेच माजी सरपंच संदेश जाधव, माजी उपसरपंच अमित मांडे, किशोर शिंदे, भाग्यश्री पवार, निखिल मोरे, दिपिका भंडारकर, किशोर शिंदे, गजानन पाटील यांनी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रायगड जिल्ह्यातील ताकद दिवसेंदिवस अधिकच वाढत असून ठाकरे गटात येणाऱ्याचा ओघ वाढू लागल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर या पक्ष प्रवेशाने भाजपाला उतरती कळा आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच हा पक्षप्रवेश चौक - नढाळ येथील पंचायतन मंदिरातील सभागृहात पार पडला. याप्रसंगी शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव, उपनेत्या ज्योती ठाकरे, संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, संपर्कप्रमुख डॉ. सुनिल पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, रघुनाथ पाटील, संतोष ठाकुर, मोतिराम ठोंबरे, श्याम साळवी, उप जिल्हासंघटीका अनिता पाटील, शैला भगत, प्रिती कडव, ममता पाटील, मनिषा ठाकूर, सुजाता गायकवाड, उपजिल्हा अधिकारी निखिल पाटील, सचिव प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, माजी उपसभापती श्यामसुंदर साळवी, रमेश पाटील, आजू सावंत, सुरेश म्हात्रे, निलम पाटील, एकनाथ मते, अँड.संपत हाडप, नितीन तवळे, संतोष पांगत, बंटी नलावडे, प्रणाल लाले, पंढरीनाथ राऊत, निखिल मालुसरे, सुहास कदम, मनोहर देशमुख, सचिन मते, सुहास देशमुख आदीप्रमुख मोठ्या संख्येने शिवसैनिक - युवासैनिक, महिला आघाडी उपस्थित होती. महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या सत्तांतराचे पडसाद कर्जत खालापूर विधानसभा - उरण विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाले असता या सत्तांतराच्या जोरावर शिंदे गटाने व भाजपाने अनेकांना वेगवेगळी आमिषे दाखवत पक्षांतर करून घेतल्याचे चित्र या दोन्ही मतदारसंघात पाहायला मिळाले असून अनेकांनी शिंदे गट व भाजपाने दिशाभूल केल्याने त्यांच्या या दडपशाहीच्या कारभाराला कंटाळून बहुतांश प्रवेशकर्त्यानी घर वापसी आणि पक्षांतर करण्यास सुरुवात केली. खालापूर तालुक्यातील मराठा समाजाचे तथा भाजपाचे नेते उत्तम भोईर व माजी सरपंच संदेश जाधव, माजी उपसरपंच अमित मांडे, किशोर शिंदे, भाग्यश्री पवार, निखिल मोरे, दिपिका भंडारकर, किशोर शिंदे, गजानन पाटील यांंनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत भाजपाच्या मनमानी - दडपशाही कारभाराला कंटाळून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा शिवबंधन मनगठी बांधत पक्षप्रवेश केल्याने दोन्ही मतदारसंघात भाजपाला उतरती कळा येऊ लागली असून शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्ष दिवसेंदिवस अधिक मजबूत होऊ लागल्याने निष्ठावंत शिवसैनिक - युवासैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे
0 Comments