हनुमंत मोरे वावोशी / खोपोली : १ जुलै,
मागील दहा वर्षापासून स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष कांचनताई जाधव यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून तालुक्यातील महिला बचत गटांना बळ देण्याचे काम सुरू केले आहे.त्यासोबत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत तालुक्यातील गरजवंतांना मदत करण्याचे काम सुरू केले आहे,त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संघटनानी त्यांचा येथोचित गौरवही केला आहे.
मात्र आपण गौरवा पुरते काम करत नसून समाजातील दिन दुबळ्या आणि गरजवंत महिलांच्या हाताला काम देऊन त्यांच्या संसाराचा गाडा पूर्वपदावर यावा यासाठीचे हे माझे प्रयत्न सुरू आहेत,माझ्या या प्रयत्नांना अनेक महिलांनी सहकार्य केल्यामुळे स्वामिनी महिला प्रतिष्ठानचे काम आणि कार्य आज समाजापुढे येताना दिसत आहे.
मी व्यवसायिक असले तरी या व्यवसायासाठी मला ज्या महिला सहकार्य करतात त्या सर्व महिला शेतकरी असून या शेतकरी महिलांसाठी प्रतिष्ठांच्या वतीने काहीतरी केले पाहिजे हा माझा संकल्प असून या संकल्पा नुसार मागील वर्षापासून आम्ही खालापूर तालुक्यात शेतकरी सन्मान योजना राबविण्याचे काम सुरू केले आहे.
मागील वर्षी हा सन्मान सोहळा ग्रुप ग्रामपंचायत तांबटी येथे पार पडला.त्यावेळी आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या वर्षाचा हा सन्मान सोहळा वावोशी येथे आयोजित करण्यात आला असून या सन्मान सोहळ्यात जवळपास ५० हून अधिक शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.या गोष्टीचा स्वामिनी महिला प्रतिष्ठानला अभिमान आहे.
आम्ही सुरू केलेले हे कार्य समाजापुढे असेच सुरू राहावे,समाजाला नवा आदर्श मिळावा यासाठी आमच्या प्रतिष्ठानच्या महिला दिवस-रात्र मेहनत घेताना दिसत आहेत. आजचा कार्यक्रम सुद्धा आमच्या सहकारी सदस्यांनी आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून आमच्या महिला भगिनींना तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे असे या निमित्ताने औ.कांंचनताई जाधव यांनी आवाहन केले आहे.
आज दिनांक १ जुलै रोजी दुपारी ठीक दोन वाजता वावोशी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शितल डोकळे त्यांनी सांगितले.
0 Comments