कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोलीचा दिवेश पालांडे ठरला पहिला रायगड केसरी

 


गुरुनाथ साठेलकर                                                        खोपोली : ७ जून,                                                                   माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान, ईगल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जून रोजी "भावी खासदार - रायगड केसरी स्पर्धा २०२३" चे भव्य आयोजन  हातणोली - चौक येथील भव्य मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेत खोपोली येथील राजाराम कुंभार संचालित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातील खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व राहिले.रायगड केसरी होण्याचा पुरुष गटाचा पहिला मान दिवेश दत्तात्रय पालांडे याला मिळाला तर उप रायगड केसरी याच संकुलातील ओमकार सदाशिव निंबळे हा ठरला. महिला गटात दिव्या भरत शिंदे हिने रायगड केसरी होण्याचा हा मान पटकावला तर उप विजेती पनवेलची अमेघा घरत ही ठरली .                                                     या स्पर्धेत कुस्ती महर्षी भाऊ उप रायगड केसरीसाहेब कुंभार कुस्ती संकुलातील कुस्तीगीरांनी सर्वच वयोगटातील वजनी गटात  आपले प्राबल्य दाखवले. त्यात १४ वर्षा खालील मुलींमध्ये क्षितिजा मरागजे ४६ किलो गटात हिने प्रथम, प्रणाली घनवट ५४ किलो गटात प्रथम, आस्था मरागजे ३५ किलो गटात द्वितीय क्रमांक पटकवला.१७ वर्षा खालील मुलांमध्ये वेद दिनेश मरागजे ३५ किलो गटात प्रथम, सार्थक शिंदे ४० किलो गटात द्वितीय क्रमांक पटकवला.               


                     १७ वर्षा खालील मुलींमध्ये सई संजय शिर्के ४० किलो गटात प्रथम, तेजस्विनी शेंडे ४९ किलो गटात प्रथम, वैष्णवी कुंभार ५३ किलो गटात प्रथम क्रमांक पटकवला.१७ वर्षा खालील मुलांमध्ये सोहेल शेख ५५ किलो गटात प्रथम विघ्नेश ससे,  ४५ किलो गटात द्वितीय श्लोक धावळकर ५० किलो गटात द्वितीय क्रमांक पटकवला.महिला रायगड केसरी गट पायल मरागजे ५० किलो गटात प्रथम, रोशनी परदेशी ५३ किलो गटात प्रथम, प्रांजली कुंभार ५७ किलो गटात प्रथम, प्राची भोईर हिने तृतीय क्रमांक पटकवला.                             पुरुष रायगड केसरी गट दिवेश पलांडे हा मानाच्या रायगड केसरी गदेचा विजेता तर ओमकार निंबळे उपविजेता ठरला तर याच गटात जयेश खरमारे याने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. उपविजेत्या ठरलेल्या ओमकार निंबळे यांने रायगड केसरी दिवेश पालांडे याला खांद्यावर उचलून घेत खिलाडू वृत्तीचे केलेले प्रदर्शन या स्पर्धेचे आकर्षण ठरले.२०१८ मध्ये आपल्या स्व. भाऊ साहेब कुंभार यांच्या कुस्ती खेळाला मानाचे स्थान मिळावे या उदात हेतूने शासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते राजाराम कुंभार यांनी संकुलाची स्थापना केली आहे. मागील चार वर्षात ५ राज्यस्तरीय पदक विजेते तर १ राष्ट्रीय पदक विजेता व ३ ऑल इंडिया स्थरावरचे खेळाडू घडविण्याचा यशस्वी प्रयत्न केले असून संस्थेच्या माध्यमातून भविष्यात याही पेक्षा अधिक स्वरूपाची कामगिरी करण्याचे ध्येय ठेवले आहे.                                                 

                     कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाचे अध्यक्ष - राजाराम कुंभार, सचिव - रायगड भूषण तथा राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार विजेते जगदिश मरागजे, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, कुस्ती मार्गदर्शक विजय चव्हाण याचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले आहे. तर सल्लागार देवदूत गुरुनाथ साठेलकर, दिनेश मरागजे, भरत शिंदे, संदीप पाटील, सुरेश चव्हाण, शरद ढवाळकर, समीर शिंदे, अमित विचारे, प्रवीण शेंद्रे यांचे सहकार्य लाभत असते.                   या स्पर्धेतील सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष मा. आम. बाळराम पाटील, तालुका तालीम संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, विभागीय सचिव मारुती आडकर, केटीएसपी अध्यक्ष संतोषजी जंगम जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष घासे, जितेंद्र सकपाळ, ज्ञानेश्वर सोगे, डॉ. रणजित मोहिते, लायन्स क्लब खोपोलीच्या अध्यक्षा शिल्पा मोदी, माजी अध्यक्ष महेश राठी, खोपोली पोलीस स्टेशनचे  सहा. पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान