जयवंत माडपे खोपोली : १ जुलै ,
खोपोली शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा स्वाती संजय सराफ यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्वाती सराफ भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षही होत्या.त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संस्थापक सदस्य, माजी उपाध्यक्षा व कवयित्री होत्या. खोपोलीतील अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता.कै.र.वा.दिघे जन्मशताब्दी समारंभामध्ये त्यांचे मोलाचेे योगदान होते. स्वाती सराफ यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा उज्वला दिघे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
0 Comments