संजय कदम पनवेल १ जुलै ,
पनवेल दि.०१ (संजय कदम) : पनवेल शहरातील आपल्या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक ४२ वर्षीय इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मोहमंद हाश्मद असे या इसमाचा नाव असून त्याचा रंग सावळा, उंची ५ फुट ५ इंच, डोक्याचे केस काळे, चेहऱ्यावर दाढी कोरलेली व मिशी, डावे डोळयाचे भुवईवर जुन्या जखमेचा व्रण, नाक सरळ व टोकदार, शरीराने मध्यम, अंगात ग्रे कलरचा शर्ट व काळे रंगाची पॅन्ट, पायात चप्पल असा त्याचा पेहराव आहे. सदर इसमाबद्दल कोणास काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार एच जी अहिरे यांच्याशी संपर्क साधावा.
0 Comments