श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) गावदेवी पाडा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन




संजय कदम 
पनवेल : १ जुलै,
  
         गुरुपरंपरा असणारा पनवेल मधील एकमेव मठ गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार ०३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
               अनंतकोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुपौर्णिमा उत्सव प.पु.सद्गुरु नाना महाराज परांजपे यांच्या कृपाशिर्वादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवीपाडा येथे सोमवार ०३ जुलै रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त पहाटे ५ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी आगरी समाज हॉल येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक गुरुवर्य मठाधीपती सुधाकर घरत (भाऊ), कु. अवधुत सुधाकर घरत व श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर