शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेची ईर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत


 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेची ईर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत


संजय कदम 
पनवेल : २४ जुलै,
       
             शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खालापूर येथील ईर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांची भेट घेत त्यांना अन्नधान्य व दैनंदिन आवश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच आणि त्याची डॉक्टरांकडून स्वैच्छिक वैद्यकीय तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले. 
              शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवआरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉक्टर जयवंत गाडे, महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ, उपसभापती श्याम साळवी, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उपसरपंच सचिन मते, युवासेना तालुका संघटक निखिल मालुसरे यांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने खालापूर येथील इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांची शिवआरोग्य सेना पनवेल रायगड जिल्ह्याच्या  पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना वस्तू रुपी दैनंदिन आवश्यक साहित्य, देण्यात आले.
             तसेच  कपडे, चादर, साड्या, टॉवेल, पाणी, सूके खाद्यपदार्थ, बिस्किट्स, महिलांच्या आवश्यक वस्तू, तेल, धान्य यांचे वाटप केले. तसेच तज्ञ डॉक्टरांकडून त्यांची स्वैच्छिक वैद्यकीय तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले. ह्यासाठी शिव आरोग्य सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ परेश देशमुख, अर्चना क्षीरसागर, नंदिता मने, सचिन सावंत, संदीप देवरे, अस्मिता नाईक, मीनल गरुड आणि वैद्यकीय तपासणी साठी आलेले डॉ प्रमोद दाभाडे, डॉ नितीन कवर ह्यांचे सहकार्य लाभले.  
            उर्मिला देहाडराय, डॉ हर्षुला देशमुख, डॉ.योगिता पवार, डॉ.आकांशा केणी, पांडुरंग अलुरकर, जितेंद्र, सुप्रिया मिराशी, संजय उत्तरे, हेमंत कांबळे, शिवानी लाड, देव वाडकर, जितेंद्र पाटील, उदय थरवल, माधुरी निकम, परवेझ अन्सारी, शेहनाझ अन्सारी, सुन्नी यादव, डॉ.चांदणी, अंशुल विश्वकर्मा, शोभा उमप, अंजली आणि अनिता कुमारी, साईश देशमुख ह्या सर्व देणगीदारांनी वस्तू रुपी व आर्थिक स्वरूपी सदर मोहिमेसाठी मदत केली. 
             शिव आरोग्य सेनेने सर्व देणगीदारांचे जाहीर आभार मानले. ह्यावेळी शिव आरोग्य सेनेचे अलिबाग तालुका संघटक साक्षत म्हात्रे, नवी मुंबई समन्वयक प्रवीण वाघराळकर, मुंबई पूर्व  समन्वय सचिव शशिकांत झोरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर