केळवली गावातील पोलीस पाटील शरद दिसले यांना पितृशोक

 


केळवली गावातील पोलीस पाटील शरद दिसले यांना पितृशोक 


समाधान दिसले 
खालापूर : २४ जुलै,

            खालापूर तालुक्यातील केळवली गावात राहणारे ह.भ.प.तुकाराम दामू दिसले यांचे वृधप काळाने दि.१८ जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी केळवली येथे निधन झाले. तर निधनावेळी त्याचे वय - ९१; वर्ष होते. तर सामाजिक, राजकीय, वारकरी अशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                                                 तर ह.भ.प.तुकाराम दामू दिसले यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली. समाजामध्ये ऐक्यांचे, बंधुत्त्वाचे, शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्तीवर मोठी श्रद्धा होती. अशी व्यक्ती सोडून गेल्याने कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.   
           तर त्यांचे दशक्रिया विधी गुरुवारी २७  जुलै रोजी श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगाव तर उत्तरकार्य रविवार दिनांक ३०  जुलै रोजी केळवली त्यांच्या निवासस्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प.दिलीप महाराज राणे (हालीवली) यांचे सकाळी १०  वाजता प्रवचन होणार असूनह.भ.प.तुकाराम दामू दिसले  याच्या पश्चात त्यांचा मुलगा शरद दिसले तसेच मुली, भाऊ, बहिणी, सुना, नातवंडे, पंतवडे, जावई असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन