पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : ५ जुलै,
कोकण मराठी साहित्य परिषद वतीने खोपोली येथील ब्राह्मण सभा सभागृहात कै. र.वा.दिघे यांच्या ४३ व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यवसायांचे एकशे एक उपाय या पुस्तकांचे लेखक महेश निमणे यांनी काहीतर उद्योग करा रे ! ही कविता सादर करण्यात आली.यावेळी त्यांनी आपल्या कवितेत नोकरी सांभाळून काहीतरी व्यवसाय केल्यांने आपल्यांना आर्थिक नफा प्राप्त होइल,तसेच आपल्या घरातील कुटुंब अथवा मित्र मैत्रीण यांना एकत्र घेवून व्यवसाय करु शकता,
परप्रांतीय यांना दोष देण्यापेक्षा आपण स्व:ताकाही तरी करा,शिवाय काही तरुण वर्ग राजकारणात न पडता स्वताचा व्यवसाय सुरु करा,आपल्यासाठी आई - वडीलांनी व्यवसाय सुरु करुन द्यावे ह्या विचारांत न राहता मी काही तरी करुन दाखवितो ही संकल्पना मनात रुजली पाहिजे अश्या माध्यमातून त्यांनी कविता सादर करून उपस्थितांचे मने जिंकली त्यांनी कविता सादर केल्यामुळे त्यांस सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे, प्रशांत गोपाळे, हनुमंत मोरे,संदीप ओव्हाळ, संतोषी म्हात्रे, कोमसाप अध्यक्षा उज्वला दिघे,कै.र.वा.दिघे यांचे सुपुत्र वामनराव दिघे, रेखा कोरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री नलिनी पाटील होत्या.
उज्वला दिघे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर कै. दिघे यांना कवितेतून आदरांजली वाहिली. प्रमुख पाहुणे प्रशांत गोपाळे यांनी र.वा.दिघे हे खोपोलीची ओळख असल्याचे सांगितले. तसेच खालापूर प्रेस क्लबच्या वतीने र.वा.दिघे यांच्या नावाने पुरस्कार दिला जात असल्याचा आवर्जून उल्लेख केला. डॉक्टर भाऊसाहेब नन्नवरे आणि वामनराव दिघे यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. नलिनी पाटील यांनी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त केले. त्यानंतर कोमसापच्या सदस्यांनी कविता वाचन केले तसेच काही सदस्यांनी आपल्या अंगातील कलागुण सादर केले. जनार्दन सताणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष नरेंद्र हर्डीकर यांनी आभार मानले. निशा दळवी यांनी पसायदान सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
*काहीतरी उद्योग करा रे*
मी म्हणत नाही नोकरी सोडून
फक्त उद्योग करा रे....
पण थोडासा वेळ काढून,
भावा-बहिणींना, मित्र परिवाराला घेऊन
इमाने इतबारे एकत्र , पार्टटाईम का होईना
संकल्प करा रे
बाबांनो काहीतरी उद्योग करा रे ||१||
उद्योग करण्यासाठी खुप सारा पैसा लागतो
असा न्यूनगंड बाळगत बसण्यापेक्षा
थोडाफार का होईना प्रामाणिक प्रयत्न तरी करा रे
बंधुहो काहीतरी उद्योग करा रे ||२||
परप्रांतीयांना दोष देत बसण्यापेक्षा,
कोण काय म्हणेल याकडे फारसे लक्ष न देता
आपली स्वप्न स्वतः पूर्ण करा रे
भावांनो काहीतरी उद्योग करा रे ||३||
राजकारण्यांच्या बंगल्यापाशी
चप्पल झिजण्यापेक्षा
नाक्यावर एखादे स्टॉल लावून
ताठ मानेने उभे राहायला शिका रे
मावळ्यांनो काहीतरी उद्योग करा रे ||४||
मायबापांनी माझ्यासाठी काय केले
हे वारंवार मनावर बिंबवण्यापेक्षा
आपण परिस्थिती सुधरवू शकतो
असे ध्येय पाठीशी ठेवून तुम्ही
त्यांच्यासाठी एक आदर्श बना रे
लेकरं हो काहीतरी उद्योग करा रे ||५||
*कवी*
महेश एकनाथ निमणे
खोपोली, रायगड
0 Comments