वावोशी येथील पीएनपी शाळेत वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न, प्रत्येक व्यक्तिने एक झाड लावले तर आपल्या देशात पुन्हा एकदा हरितक्रांती घडलेली दिसेल-- चंद्रकांत पाटील

 


हनुमंत मोरे 
वावोशी / खोपोली ५ जुलै,

               वृक्ष  लागवडीचे महत्व आज जरी कोणाला समजले नसले तरी दिवसेंदिवस वातावरणातील बदलांचा फरक मात्र वृक्ष लागवडीचे महत्व समाजावून सांगत असतांनाच मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो.त्याचा परिणाम यंदा वाढलेली उष्णता व लांबलेला पाऊस आहे.निसर्गाची होत असलेली हाणी  कुठेतरी थांबविण्याची गरज आहे.वावोशी परिसरात शैक्षणिक ज्ञानाचे भांडार असलेल्या पीएनपी शाळेने नैसर्गिक समतोल राखत हाती घेतलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.

            आपण प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प करून तो प्रत्येक्षात राबविला तर आपला देश पुन्हा एकदा हरितक्रांतीने नटलेला दिसेल,पीएनपी शाळेची यशाकडे चाललेली प्रगती पाहून आनंद होत आहे.शुन्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद शिक्षकांमध्ये असते त्यामुळे एक दिवस पीएनपी शाळेचा असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
                 

  यावेळी पीएनपी शाळेच्या वतीने वृक्ष लागवडीचे महत्व विषद करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पूनम फुलारे यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व समजावून सांगितले तर इयत्ता १० वी चे विद्यार्थी कु.पारस गोरे,कु.अब्दुल खोत,कु.दिपाली मोरे,प्रियांका शर्मा यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्व विषद करणारी नाटीका सादर केली.

               या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष प्रमोद जाधव, सदस्य उमेश पाटील,राजेंद्र पाटील,बांबू बांदल, चंद्रकांत पाटील,संतोष पाटील, मिलिंद दाभोलकर, शशिकांत पाटील,राजू आढावकर,संतोष हातनोलकर, अभिजित ठाकूर यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले. 


                यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम फुलारे, सोनाली जाधव,नेहा पाटील,सायली कदम, वैशाली चव्हाण ,हर्षला शहासने ,रंजना देशमुख,रूपाली चौधरी,समृध्दी पोटे, सुप्रिया गायकवाड,रोजलीया उजुल,सायली शेळके,पूनम म्हामुणकर,भारती पाटील,यशवंत घारे आदी शिक्षकवर्ग व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप