दुकानाचा लॉकचे लॅच तोडून रोख रक्कम लंपास

 


संजय कदम                                                                       पनवेल १ जुलै,

पनवेल शहरात असलेल्या मिठाईच्या दुकानाचा लॅच तोडून दुकानात असलेली ९५ हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना येथे घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

               धवल शहा यांचे पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रभुजी मिठाईचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी त्यांच्या काकांनी दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता दुकानात ठेवलेली ९५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना दुकानाचे लॉकचे लॅच तुटलेले दिसून आले. याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर