नेरळ कन्या २ शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
दत्तात्रय शेडगे
खोपोली : १४ ऑगस्ट,
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रायगड जिल्हापरिषद कन्या शाळा २ नेरळ येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव मंडळ नेरळ यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असतात त्याचप्रमाणे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद कन्या २ शाळेतील मुलांना खाऊ वाटप करून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रमुख उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर सेवानिवृत्त सैनिक कुमार जाधव फ़ौजी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरी खांडके, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगाडे, ज्योतिलिंग सामाजिक बहुउद्देशीय संस्था मुबंई अध्यक्ष रामचंद्र पुकळे, राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव मंडळ नेरळचे अध्यक्ष परमानंद गोविंद नाचण, सचिव रोहिदास विष्णू पवार,कार्याध्यक्ष श्रीराम बंडगर, डॉ महेंद्र बेरगळ,सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब डोळसे, सेवानिवृत्त सैनिक फौजी कुमार जाधव, केतन पोतदार, तानाजी माने, प्रकाश माने, अनिरुद्ध पुकळे अमर घुटुकडे, शीतल पुकळे भारती घुटुकडे, आदींसह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments