आमदार प्रशांत दादा ठाकुर यांचा वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना रेन कोट वाटप

 आमदार प्रशांत दादा ठाकुर यांचा वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना रेन कोट वाटप



दीपक जगताप
खालापूर : १३ जुलै,

          आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या ५ ऑगस्ट  वाढदिवसानिमित्त कुठेही जाहिरातबाजी, बॅनरबाजी करू नये तसेच पुष्पगुच्छ व कुठलेही भेटवस्तू आणू नये त्याऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आमदार प्रशांत दादा ठाकुर यांनी केले होते.भारतीय जनात पार्टीने खोपोली शहरातील महात्मा गांधी नगरपरिषद शाळा क्रमांक ११ शिळफाटा येथील १२० विद्यार्थ्यांना आज रेन कोट भेट म्हणून वाटप करण्यात आले. 
                  सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाऊसात भिजत येण्याशिवाई पर्याय नव्हता, तर काही विद्यार्थी शाळेत येऊ शकत नव्हते. भाजपचे युवा नेते राहुल जाधव, शहर चिटणीस गोपाळ बावस्कर, वैद्यकीय सेलचे सह संयोजक विकास खुरपडे, शक्ती केंद्र प्रमुख संजय म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नातून या विद्यार्थ्यांना हि भेट आमदार प्रशांत दादा ठाकुर यांचा माध्यमातून मिळून दिली व आज ५ ऑगस्ट त्यांचा वाढदिवसा निमित्त त्याचे वाटप करण्यात आले.
                सेवा कार्याचा या प्रशांत दादांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी खोपोली शहराचा वतीने या सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे देखील वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक स्वाती विकास खुरपडे यांनी केले.भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी दानशूर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा राजकीय, शैक्षणिक व सामाजिक वारसा आमदार प्रशांत दादा ठाकुर कशा पद्धतीने पुढे चालवत आहेत या संदर्भात माहिती दिली.खोपोली शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
               सेवा कार्याच्या कर्यक्रमध्ये सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, माथाडीचे रामभाऊ पवार, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, देवेंद्र पाटील, सुनील नंदे, निकेत पाटील, डॉ. नागरगोजे, महिला मोर्चा अध्यक्षा शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, उपाध्यक्षा अपर्णा साठे, जिल्हा कोषाध्यक्ष रसिका शेट्टे, चिटणीस गीता मोहिते, सुप्रिया नांदे, सागर काटे या  व सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रेन कोट आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
             या कार्यक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षिका समीक्षा धानिवले, अश्विनी बिरादार, शाळेचे विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक गोरखनाथ सानप यांनी कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार मानले मानले.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव