स्वच्छ्ता हीच आरोग्याची गुरुकिल्ली डॉ.राजाराम हुलवान

 स्वच्छ्ता हीच आरोग्याची गुरुकिल्ली डॉ.राजाराम हुलवान



दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २१ ऑगस्ट,

               गारबेज फ्री इंडिया व ग्रामपंचायत नारंगी यांच्या संयुक्त विद्यमाने आज नारंगी गावात आरोग्य व स्वच्छता या विषयावर डॉ.राजाराम हुलवान  यांनी गावातील महिला, विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. स्वच्छ्ता हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे , प्रत्येक गाव जर प्लॅस्टिक मुक्त झाला तर संपूर्ण देश स्वच्छ होईल व रोगराई कुठेही पसरणार नाही असे सांगत डॉ हुलवान यांनी वृक्षारोपण व  संगोपनाचे  महत्त्व पटवून देत  वैयक्तिक स्वच्छता , मुलांच्या आहाराबाबत व दिनचर्या बाबत मार्गदर्शन केले.  
                स्वच्छता जेथे आरोग्य नांदे तेथे ! असे आपण सातत्याने म्हणत असतो.मात्र प्रत्येकांने ते विचारांत आनले पाहिजे,शिवाय आपल्या घरामधून निघणारा ओला,सुका कचरा यांचे वर्गीकरण करणे अतिषय आवश्यक आहे.त्याच बरोबर आपण स्वता सुरक्षित राहून दुसऱ्या सुरक्षित ठेवले पाहिजे,शासनांच्या माध्यमातून पावसाळ्यात आपणांस विविध माध्यमातून जनजागृती केली जाते.मात्र आपण सातत्याने त्या कडे दुर्लक्ष करीत असतो. परिणामी आपण केलेल्या चुकामुळे आपल्याच घरातील कुटुंब आजारी पडू शकतात. म्हणून प्रत्येकांनी स्वच्छतेची कास धरणे महत्वाचे आहे.
                  या कार्यक्रमास सरपंच उदय म्हात्रे,शिक्षिका सुजाता मोकल व महिला बचत गटांच्या अध्यक्षा सदस्य , ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी गारबेज फ्री इंडिया व हिरेमठ परिवार कडून  विद्यार्थांना चांगल्या प्रतीचे शूज वाटप करण्यात आले. सूत्र संचालन समाज सेवक कृष्णा वाघमारे यांनी उत्तम रित्या करीत सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप